खटाव:-मायणी परिसरात डुकरांचा धुमाकूळ शेतकरी हैरान.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
मायणी परिसरात डुकरांचा धुमाकूळ शेतकरी हैरान.
मायणी प्रतिनिधी___खटाव तालुक्यातील विशेषतः मायणी परिसरात सध्या डुकरांनी धुमाकूळ घातल्याने या परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की येथील वडार समाजातील लोक डुकरे पाळण्याचा व्यवसाय करतात परंतु डुकरांना बंदिस्त जागेत ठेवत नाहीत त्यामुळे ही डुकरे रानातून मोकाटफिरतअसतात काही तासातच ही डुकरे पूर्ण पिकाचा सत्यानास करतात बाबत येथील शेतकरी प्रणय बागडे यांनी सांगितले की महिन्यापूर्वी याच डुकराने धुमाकूळ घातला होता याबाबत आम्ही पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिलेली होती परंतु पोलिसांनी त्या समाजातील लोकांना समज देऊन सोडले परंतु आता पुन्हा डुकरे पिकाचा सत्यानास करू लागले आहेत तरी पोलीस इन्स्पेक्टर शितल पालेकर यांनी वैयक्तिक लक्ष देऊन डुकराचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे