आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोहगाव :-रयत मधून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडावेत – संजीव भोर.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर :-7507469042

मोठ्या संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

लोहगाव (वार्ताहर) :- विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांना सामोरे जाऊन सर्वगुणसंपन्नता प्राप्त करावी. केवळ गुण प्राप्त न करता अष्टपैलू विद्यार्थी घडावीत, असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते संजीव भोर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी संकुलातील विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत रयतचे प्रतीक वटवृक्ष, कर्मवीरांची प्रतिमा तसेच कर्मवीरांचा व लक्ष्मीबाईंचा जिवंत देखावा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांच्या लेझीम, टिपरी, कलश या पथकांनी सहभाग घेऊन नृत्य सादर केली. याप्रसंगी संकुलाचे प्राचार्य नानासाहेब शेळके पर्यवेक्षक देवराम वडीतके, ज्ञानदेव माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते व माजी विद्यार्थी संजीव भोर, जनरल बॉडीचे सदस्य रावसाहेब म्हस्के पाटील आदींच्या शुभहस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य नानासाहेब शेळके यांनी केले. याप्रसंगी जनरल बॉडी सदस्य माजी प्राचार्य बी. जी. आंधळे माजी प्राचार्य अण्णासाहेब साबळे, रतिलाल भंडारी, चंदुभाई तांबोळी, सुधीर म्हस्के, राजेंद्र आहेर, शरद तांबे, सरपंच गणेश हारदे, गोरक्षनाथ आढाव, प्रभाकर खर्डे, भागवत कडू. रमेश घोगरे, धोंडीभाऊ कडू, बाळकिसन खर्डे, बनकर, माधव भोकनळ, दगडू खर्डे, नानासाहेब गांगड, दत्तात्रय चौधरी, हरिभाऊ चौधरी, विश्वास राजगुरू, तुळशीराम नळे, विठ्ठल गोडसे, दत्तात्रय निर्मळ, नारायण जाधव, प्राचार्य नानासाहेब शेळके, मुख्याध्यापिका ज्वाला कांबळे, ज्ञानदेव माळी, बाबासाहेब अंतरे यांच्यासह माजी शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अशोक तिटकारे, संजय वर्पे, दीप्ती रुपवते, पर्यवेक्षक देवराम वडीतके यांचा आदर्श शिक्षक म्हणून तर डॉ. शरद दुधाट यांनी पीएच.डी. ही पदवी मिळाल्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा प्रमुख पाहुणे संजीव भोर व अध्यक्ष रावसाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पारितोषिकांचे निवेदन डॉ. शरद दुधाट यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजीव भोर यांनी विद्यालयातील अनेक आठवणींना उजाळा देत विद्यालयाच्या आणि संस्थेच्या यशस्वी घोडदौडीचा परामर्श घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के यांनी माजी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक करत गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी सर्व समित्यांचे प्रमुख, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट, रेणुका वर्पे, अश्विनी सोहनी, श्रीमती स्वामिनी गहिरे यांनी केले तर शेवटी पर्यवेक्षक देवराम वडीतके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button