कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-साताऱ्यात प्रथमच भव्य भरड धान्य खरेदी विक्री महोत्सव.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यात प्रथमच भव्य भरड धान्य खरेदी विक्री महोत्सव.

सातारा दि: स्वावलंबी भारत अभियान सातारा जिल्हा व रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प यांच्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधून सातारा तालुक्यासाठी भव्य भरड धान्य खरेदी विक्री महोत्सव २०२३ हा उपक्रम शनिवार दिनांक १९ व २० ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आयोजित केला असल्याची माहिती संयोजकांनी दिलेली आहे.
सातारा शहरातील अलंकार सभागृह पोलीस करमणूक केंद्र या ठिकाणी विनामूल्य ४० शेतकऱ्यांचे तसेच महिला बचत गटाचे स्टॉल उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व भरड धान्य ग्राहकांना मापक दरात मिळणार असल्याने सातारकरांसाठी एक चांगली संधी ठरलेली आहे. भरड धान्य आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून यामध्ये मानवी जीवनासाठी आवश्यक असणारे गुणकारी जीवनसत्व मिळते. तसेच शेतकऱ्याने स्वतःच्या कष्टातून तयार केलेले स्वच्छ व गुणवत्ताधारक भरड धान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे .
आरोग्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या अत्यंत चांगले असलेले हे धान्य तसेच बाजरीचे चॉकलेट व इतर खाद्यपदार्थही म्हणजेच भरड धान्यापासून तयार केलेले उत्पादनही उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी व्यावसायिक प्रशिक्षणही व मार्गदर्शन होणार आहे. सदर भरड धान्य खरेदी विक्री महोत्सवासाठी स्वावलंबी भारत अभियान जिल्हा समन्वयक श्रीराम दीक्षित, आशिष शहाणे, जयदीप ठुसे, रामचंद्र भोसले, रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पचे अध्यक्ष विजय बाचुलकर आदी मान्यवर या भरड धान्य खरेदी विक्री महोत्सवासाठी परिश्रम घेत आहेत .कोरोना संकटानंतर भारतातील बेरोजगारीचे दर टक्केने वाढलेले आहेत. हे कमी करण्यासाठी हा प्रयत्न आहे.
—————————————————————-

फोटो- भरड धान्य महोत्सवाची माहिती देताना स्वावलंबी भारत अभियान व रोटरी क्लबचे पदाधिकारी (छाया -अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button