ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मेढा:-राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज…

मेढा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्याचे नाव सात समुद्रापलीकडे पोहोचवणारे अनेक हिरे रत्ने तयार झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात जावळीचा वाघ असे गौरव उद्गागार ज्यांच्यामुळे निघतात ते माथाडी कामगार नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप गट) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचा जावळीकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यासाठी तालुक्याचे ठिकाण असलेली मेढा नगरी सज्ज झालेली आहे.
१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्मितीनंतर खऱ्या अर्थाने जावळीचे राजकारण उदयास आले. जावळीचे सुपुत्र बाबासाहेब आखाडकर, कृष्णराव तरडे ,स्वर्गीय भि . दा. भिलारे गुरुजी, जी जी कदम, लालसिंगराव शिंदे यांची काँग्रेस विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायम ठेवली. त्यामध्ये हुमगाव तालुका जावळी आमदार शशिकांत शिंदे यांचा खारीचा वाटा आहे. १९९५ साली शिवसेनेचे सदाशिव सकपाळ या सामान्य शिवसैनिकाने इतिहास घडवला. त्यामुळे जावळीचे नाव आदराने घ्यावे लागते. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदार संघातही आपल्या नेतृत्वाची चुणक दाखवली आहे. महाराष्ट्रात सर्व परिचित असलले ते एक नेते आहेत.
जावली तालुक्याचे सुपुत्र, माजी जलसंपदा मंत्री तथा सातारा जिल्हा माजी पालकमंत्री आ.शशिकांतजी शिंदे यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरचंद्र पवार गट)पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल तमाम जावलीकरांच्या वतीने सोमवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता मेढा नगरीतील कलश मंगल कार्यालयात भव्य दिव्य नागरी सत्कार होत आहे. या सत्काराची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे .
जावळी तालुक्यातील १५९ गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह हा विकास आघाडीचे ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच हे राजकीय मतभेद विसरून या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जावळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री सुरेश पार्टे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराची आठवडाभरापासून जय्यत तयारी सुरू आहे. जावळीचे माजी सभापती मोहनराव शिंदे, मनोज परामणे, बुवासाहेब पिसाळ,महादेव भालेघरे, विठ्ठल गोळे, चंद्रकांत गवळी, गोपाळ बेलोशे, मयूर देशमुख, सुभाष देशमुख, सुनील फरांदे, राजेंद्र कदम रामदास पार्टे ,रोहित रोकडे, प्रमोद पवार, रूपाली भिसे, सोमनाथ कदम, लक्ष्मण पवार ,भालचंद्र रांजणे, रामदास रांजणे, लाला चव्हाण, अर्जुन गावडे, बाळासाहेब मामुलकर ,संतोष शेलार, विजय भिलारे ,राजेंद्र जाधव, मोहम्मद शेख, ह.भ.प. विजय महाराज, प्रदीप शिंदे, प्रकाश कांबळे, यांच्यासह जावळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन आणि विविध जाती धर्माच्या संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित राहणार असल्याने श्रावणी सोमवारी हा सत्कार सोहळ्याने गाजणार आहे. सत्काराच्या नियोजनासाठी करहर, केळघर, मेढा, कुडाळ, सायगाव भागामध्ये कार्यकर्ते बैठका घेत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जावळीकरांचा दबदबा पाहण्यासाठी जावळीकर आतुर झाल्याचे चित्र दिसत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button