पुणे:-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
पुणे प्रतिनिधी :- बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्य हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती गोकुळ नगर पठार वारजे पुणे .येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने अण्णा भाऊंच्या फोटोला अभिवादन करण्यासाठी गर्दी करण्यात आली होती.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीने भारतीय साहित्यात क्रांती घडवली. त्यांनी लिहिलेलं साहित्य केवळ कला, अभिव्यक्ती नव्हती. ते एक आंदोलन होतं, बंड होतं ! अण्णा भाऊंनी सुमारे ३५ हून अधिक कादंबऱ्या, १५ कथासंग्रह, शेकडो लेख, पोवाडे, लोकनाट्यं आणि शाहिरी गीतं लिहिली.
अन्यायाविरोधात बंड करणाऱ्या माणसाची कहाणी त्यांनी काल्पनिकतेच्या साहाय्याने नव्हे, तर वास्तवाच्या जळत्या भट्टीतून साकारली. त्यांनी लोककलेतून परिवर्तनाचा संदेश दिला..
त्यांचं साहित्य सामाजिक वास्तवाचं आरसपानी दर्शन घडवतं.
झोपडपट्टीतील वेदना, अन्याय, भूक, बेरोजगारी, आणि सामाजिक विषमता यांचं त्यांनी प्रखर आणि थेट भाष्य केलं. अशा प्रकारे कार्यक्रम उत्साहाने आयोजित करणारे आयोजकः कल्याण नामुळे, रफिक शेख, खंडागळे साहेब, साठे साहेब, भिसे साहेब, विनोद मजदे, गणेश पान पाटील, सतीश सकट , नारायण देडे ,आप्पा लांडगे तसेच गोकुळ नगर पठार वासी प्रमुख उपस्थिती भारत भूषण शरद आबा बराटे तसेच समाजसेवक दत्ताभाऊ भिलारे यांच्या हस्ते या भागातील लहान मुलांसाठी दोनशे पेन वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांना व नागरिकांना पुलाव वाटप करण्यात आले.
तसेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले वारजे पोलीस अधिकारी यांचा सुद्धा पेन (लेखणी) देऊन सन्मान करण्यात आला, अशा पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला ..
जय लहुजी
अशा या साहित्यसम्राटाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन!