बीड:-निकालाची प्रत देण्यासाठी 1500 रूपये लाच स्विकारताना सरकारी वकिलाच्या विशेष सहायकास अटक.
प्रतिनिधी शफिक शेख :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
निकालाची प्रत देण्यासाठी 1500 रूपये लाच
स्विकारताना सरकारी वकिलाच्या विशेष सहायकास अटक.
बीड, दि. 21 (शफिक शेख) – तक्रारदार यांनी दाखल केलेल्या गुन्हयाचा निकाल लागल्यानंतर निकालाची प्रत काढून देण्यासाठी श्रीमती सुरेखा लांब (वायबसे), विशेष सहायक सरकारी वकील, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय, धारूर, बीड यांना 1500 रूपये रकमेची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी धारूय येथील प्रथम वर्ग न्यायालयात गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा निकालही लागला. निकाल लागल्यानंतर निकालाची प्रत काढण्यासाठी दिनांक 13/9/2022 रोजी जेव्हा तक्रारदार श्रीमती. लांब (वायबसे) यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी निकालाची प्रत काढण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 1500 रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथे तक्रार दिली.
दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड च्या सापळा रचणा-या विभागाने सापळा रचून दिनांक 20/9/2022 रोजी तक्रारदार यांच्याकडून 1500 रूपये रकमेची लाच स्विकारताना श्रीमती. सुरेखा लांब (वायबसे), विशेष सहायक सरकारी वकील, (वर्ग 2- कंत्राटी) यांना प्रथम वर्ग न्यायालय, धारूर न्यायालयाचे परिसरातून रंगेहाथ पकडले आणि धारूर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (सुधारित 2018) कलम 7 अन्वये गुन्हा दाखल केला.
सदरची संपूर्ण कारवाई लाप्रवि औरंगाबादचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, लाप्रवि औरंगाबाद अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, लाप्रवि बीडचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, अमोल खरसाडे, चालक पोलीस अंमलदार गणेश म्हेत्रे यांनी केली.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की, भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाविरूद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्याशी संपर्क साधावा.
पत्ता – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड
टोल फ्री क्रमांक – 1064
संकेतस्थळ – acbwebmail@mahapolice.gov.in
ई मेल आयडी – dyspacbbeed@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार अॅप्लीकेशन – acbmaharashtra.net
दूरध्वनी – 02442-222649
व्हॉट्स अॅप – 9930997700
पोलीस अधीक्षक लाप्रवि औरंगाबाद – 8888807299
अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि औरंगाबाद – 98811008123
पोलीस उपअधीक्षक लाप्रवि बीड – 9355100100