पनवेल:-बदली करण्यासाठी 1,00,000/- रूपयांची लाच स्विकारताना पोलीस निरीक्षकास अटक.
प्रतिनिधी शफिक शेख :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
बदली करण्यासाठी 1,00,000/- रूपयांची लाच
स्विकारताना पोलीस निरीक्षकास अटक.
पनवेल, दि. 21 (शफिक शेख) – तक्रारदार यांची व त्यांच्या सहका-याची बदली करण्यासाठी 100000 रूपयांची लाच स्विकारताना पनवेल महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस निरीक्षक रामचंद्र वारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार आणि त्यांचे सहकारी हे दोघेही आपली बदली करण्यासाठी श्री. वारे यांच्याकडे गेले असता श्री. वारे यांनी प्रति बदली 50,000/- रूपये अशी दोघांची मिळून 1,00,000/- रूपये लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांच्याकडे तक्रार केली असता सापळा रचून दिनांक 20/9/2022 रोजी आरोपी वारे यांच्या केबिनमध्ये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर कार्यालयाच्या सापळा पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आणि कलम भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (सुधरणा 2018) चे कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंदविला गेला.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की, भ्रष्टाचारासंधाी काहीही माहिती असल्यास किंवा लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांचेशी संपर्क साधावा.
पत्ता – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर, पालघर प. 401404
वेबसाईट – acbmaharashtra@mahapolice.gov.in
ई-मेल – dypacbpalghar@gmail.com
अॅप्लीकेशन – acbmaharashtra.net
टोल फ्री नं – 1064
दूरध्वनी क्रमांक – 025252.97297
व्हॉटस्अॅप नंबर – 9923346810