ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:- निगडी -मधुकर पवळे पुलाखालील रिक्षा स्टॅंड पुन्हा स्थापन करावे – श्री. राजू शेख.

प्रतिनिधी शाफीक शेख निगडी पुणे :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

मधुकर पवळे पुलाखालील रिक्षा स्टॅंड पुन्हा स्थापन करावे – श्री. राजू शेख.
निगडी, दि. 21 (शफिक शेख):- मागील 15 वर्षांपासून निगडी पुलाखाली रिक्षा व्यवसाय करणा-या 40 ते 50 रिक्षा चालकांना हटवून तेथे बेकादेशीरपणे उभारण्यात आलेल्या लोखंडी पत्रा शेड मारून व्यवसाय करणा-यांचे दुसरीकडे पुनर्वसन करावे आणि रिक्षा स्टॅंडची तेथे पुन्हा स्थापना करण्याची मागणी महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे निगडी शाखेचे आधारस्तंभ श्री. राजू शेख यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंह यांना केली.
यावेळी बोलताना श्री. राजू शेख पुढे म्हणाले की, निगडी मधुकर पवळे पुलाखाली मागील 15 वर्षांपासून 40 ते 50 गरीब, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय बहुजन समाजातील रिक्षाचालक हे व्यवसाय करीत असून त्यांचे या व्यवसायावरच पोट आहे. 2016 साली वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि मनपा अधिकारी यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्र रिक्षा संघटनेने या पुलाखाली रिक्षा स्टॅंडची स्थापना करून या गोरगरीब रिक्षाचालकांना दिलासा दिला. परंतु अचानक या ठिकाणी काही दिवसांपूर्वी काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे लोखंडी शेड मारून या ठिकाणी आपापली नावे टाकून त्या शेडस्चे उद््घाटन केले आणि काहींनी ते भाडयाने दिले. त्यामुळे येथील रिक्षा चालक मालकांना उपजिविकेचे कोणतेही साधन उरलेले नाही. हे सर्व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आणि बहुजन मागासवर्गीय रिक्षा चालक मालकांना त्यांच्या हक्काच्या जागेपासून वंचित ठेवण्यासाठी हा पूर्ण खटाटोप काही विशिष्ट वर्गाकडून केला जात आहे. माननीय आयुक्तांनी या ठिकाणची बेकायदेशीर शेड काढून पुन्हा रिक्षा स्टॅंड स्थापन करून गरीब आणि बहुजन समाजातील या रिक्षा चालक-मालकांना न्याय द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
लवकरात लवकर या बाबतीत तोडगा न काढून रिक्षा स्टॅंडला त्यांची जागा परत न दिल्यास आपण सर्व रिक्षा चालकांसमवेत या निगडी पुलाखाली उपोषणास बसणार असल्याचेही यावेळी राजू शेख यांनी सांगितले. यावेळी रिक्षा स्टॅंडचे अध्यक्ष सचिन श्ंिादे, उपाध्यक्ष हैदर शेख, ख्जिनदार नवनाथ शेलार, सलिम मुकरताल, अविनाश साळवे, सुरज हातागळे, इमाम विजापूरे, आरिफ शेख आणि स्टॅंडचे सर्व सभासद उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button