आळंदी:-लेखा परीक्षा अधिका-यास ‘‘चूप’’ राहण्यासाठी 30000 ची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
लेखा परीक्षा अधिका-यास ‘‘चूप’’ राहण्यासाठी
30000 ची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
पुणे, आळंदी, दि. 20 (शफिक शेख) – खेड तालुक्यातील नाणेकरवाडी ग्रामपंचायतीचे लेखा परीक्षण करतेवेळी ग्रामविकास अधिकारी यांच्या नेमणुकीच्या कालावधील कामकाजामध्ये आढळून आलेल्या त्रुटी /अनियमिततेसंबंधाने वसुलीचा रिपोर्ट न पाठविण्यासाठी सहायक लेखा परीक्षा अधिकारी श्री. महेश एकनाथ म्हात्रे यांना 30000 रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिट 2 यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रार दाखल करणारे हे ग्रामविकास अधिकारी असून पूर्वी ते खेड तालुक्यातील नाणेकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत होते. त्या ग्रामपंचायतीचे लेखा परीक्षण आरोपी म्हात्रे यांनी केले होते. त्यामध्ये तक्रारदार यांच्या नेमणूक कालावधीमध्ये त्रुटी/अनियमितता आढळून आली. त्याबाबतचा वसुलीचा रिपोर्ट न पाठविण्यासाठी म्हात्रे यांनी तक्रारदार यांच्याकडे 30000 रूपयांची लाच म्हणून मागणी केली. त्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे केली.
त्यानुसार ला.प्र.विभागाने कारवाई करत दिनांक 16/9/2022 रोजी सापळा रचला आणि तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारताना म्हात्रे यांना रंगेहाथ पकडून अटक केली. दिनांक 17/9/2022 रोजी मा. विशेष न्यायालय, खेड यांच्यासमोर म्हात्रे यांना उपस्थित केले असता कोर्टाने त्यांना दिनांक 19/9/2022 पर्यंत पोलीस रिमांड कस्टडची मंजूरी दिली.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक श्री. राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव आणि पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.
शासकीय अधिकारी/कर्मचारी /लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास खालील नमूद क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक श्री. राजेश बनसोडे यांनी केले.
हेल्पलाईन क्रमांक 1064
अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे – 02026122134, 02026132802, 02026050423
व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – 7875333333
व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – 9930997700
ईमेल आयडी पुणे – dyspacbpune@mahapolice.gov.in
वेबसाईट – www.acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन अॅप तक्रार – www.acbmaharashtra.net.in