ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पिंपरी चिंचवड:-बहुजन समाजवादी पार्टीचा गुरूवारी पिंपरीत परिवर्तन मोर्चा.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

बहुजन समाजवादी पार्टीचा गुरूवारी पिंपरीत परिवर्तन मोर्चा.
पिंपरी, दि. 20 (शफिक शेख) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत राहणा-ऱ्या नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा, रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन, गुंठेवारीतील बांधकाम नियमित करण्याबाबत शुल्क कमी करणे, महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत उपचार, अनधिकृत बांधकाम, माता रमाई यांचे स्मारक, राष्ट्रपिता महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक अशा अनेक विषयांना वाचा फोडण्यासाठी आणि या विषयांचा महानगरपालिकेतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुरुवारी (दि.२२) सकाळी ११:३० वाजता बहुजन समाज पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर परिवर्तन मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठया प्रमाणात पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना सामील होण्याचे आवाहन बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी पत्रकार परिषदेत केले.
बसपाचे प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देशाचे प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ आदेशाने आयोजित केलेल्या या मोर्चात शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष धम्मदिप लगाडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुशिल गवळी, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा गायकवाड, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष अनिल रणनवरे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. चलवादी यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात एसआरए अंतर्गत झोपडपट्टी धारकांचे जागेवरच पुनर्वसन करावे, प्रत्येक झोपडीधारकास पाचशे स्क्वेअर फुटांचे घर मिळावे, रेल्वे हद्दीतील बाधित झोपडपट्टी धारकांचे आधी पुनर्वसन करावे मगच स्थलांतर करावे, मागील दोन महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील रुग्णालय व दवाखान्यात उपचारांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. ही दरवाढ रद्द करून गोरगरीब नागरिकांना या सर्व रुग्णालय व दवाखान्यांमध्ये मोफत उपचार मिळावे, महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप त्वरित करावे, कष्टकरी कामगारांना गोरगरिबांना या गुंठेवारीचे बांधकाम नियमित करण्यात अडचणी येत आहेत याचे शुल्क देखील कमी करावे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे प्रशस्त जागेत स्मारक उभारले जावे, राष्ट्रपिता महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम त्वरित चालू करावे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे असणाऱ्या आरक्षित जागेत माता रमाईच्या स्मारकाचे काम सुरू करावे. अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे “गरिबांना भय व श्रीमंतांना अभय” या पद्धतीने काम चालू आहे हे ताबडतोब थांबवावे, शहरातील नागरिकांना २४ तास पाणी मिळत नाही. हा प्रलंबित प्रश्न देखील नवीन आयुक्त यांनी प्राधान्याने सोडवावा, पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागात कंत्राटी सर्व कचरावेचक कामगारांना मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार “समान काम समान वेतन” देण्यात यावे, तसेच वैद्यकीय उपचाराकरिता किमान पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा उतरवण्यात यावा, अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड बहुजन समाज पार्टीच्या वतीने गुरुवारी आयोजित केलेल्या परिवर्तन मोर्चात हजारो नागरिक सहभागी होणार आहेत.
हा परिवर्तन मोर्चा गुरुवारी सकाळी ११:३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे मुंबई महामार्गावरून मोरवाडी चौकातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन येथे येणार आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button