मुंबई:-गडकिल्ल्यांच्या साठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची घोषणा.
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9307293406

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
ब्रेकिंग
गडकिल्ल्यांच्या साठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची घोषणा.
*समस्त हिंदू बांधवांच्या आझाद मैदानावर गडकिल्ल्यांसाठी केलेले आंदोलन यशस्वी
*मुंबई
समस्त हिंदू बांधवांच्या आझाद मैदानावर गडकिल्ल्यांसाठी आंदोलन यशस्वी, संपुर्ण महाराष्ट्रातुन हिंदू बांधव आंदोलनासाठी मुंबई मध्ये दाखल झाले, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आंदोलन सुरू झाले आझाद मैदानाच्या दिशेने निघाले होते, परंतु मुख्यमंत्री आल्याशिवाय हे आंदोलन थांबवणार नाही असा पवित्रा आंदोलन करत्यानी घेतला होता, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता, पुन्हा आंदोलक मंत्रालयाच्या दिशेने निघाले, परंतु पोलीस जाऊन देत नव्हते, परंतु आंदोलक आक्रमक झाले आणि रस्त्यातच ठिय्या मांडत मुख्यमंत्री आल्याशिवाय उठणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, गडकिल्ल्यांच्या साठी स्वतंत्र महामंडळ स्थापन झालच पाहिजे, लवकर या लवकर या मुख्यमंत्री साहेब लवकर या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता, मुख्यमंत्र्यांचा निरोप आला की आझाद मैदानावर या मी दहा मिनिटात तिथे येत आहे, पुन्हा आंदोलक आझाद मैदानावर आले, मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच समस्त हिंदू बांधवांनी एकच जल्लोष केला,लोकनाथ एकनाथ, महामंडळ स्थापन झालच पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्विकारत हिंदू बांधवांनी एकच जल्लोष केला, आणि एक इतिहास घडवला की स्वता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात येत आहे,अशी घोषणा केली, संपुर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हिंदू बांधवांचे स्वागत केले,खरच महाराष्ट्रत हिंदूत्वाचे सरकार आहे हे दाखवून दिले, कोणताही मुख्यमंत्री आझाद मैदानावर आंदोलनासाठी आलेला नाही, शिंदे साहेब तुम्ही आलात त्याबद्दल समस्त हिंदू बांधवांच्या वतीने तुमचे आभार मानतो, असे म्हणत, प्रेरणा मंत्र, देह मंत्र घेत आंदोलनाची सांगता केली.