चाकण :-वाकी फाटयावर भरदिवसा तरूणीचा विनयभंग, आरोपीस अटक.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
वाकी फाटयावर भरदिवसा तरूणीचा
विनयभंग, आरोपीस अटक
चाकण, दि. 19 (शफिक शेख):- महिलांच्या असुरक्षिततेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत असताना वाकी फाटा, पुणे-नाशिक हायवे रोडच्या कडेला एका महाविद्यालयीन तरूणीचा त्यांच्याच परिसरात राहणा-या तरूणाने फिर्यादी तरूणीस मला तुइयासोबत लग्न करायचे आहे, तू माइयासोबत चल असे म्हणून त्याच्या चारचाकी सेलेरियो गाडीमध्ये ओढण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी तरूणी ही दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता वाकी फाटा, पुणे-नाशिक हायवे येथून खेड येथील कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट पाहत उभी असताना त्यांच्याच परिसरात राहणारा आरोपी तरूण याने आपले चारचाकी सेलेरिया गाडी त्या मुलीसमोर उभी केली आणि तू मला आवडतेस, तू माइयासोबत लग्न कर, तू माइयासोबत चल असे बोलून तिचा हात धरला आणि तिला बळजबरीने गाडीमध्ये ओढू लागला. तरूणीने आरडाओरड करण्यास सुरूवात केली त्यामुळे घाबरलेल्या तरूणाने तेथून पळ काढला. त्यानंतर घाबरलेल्या तरूणीने घरच्यांना हा प्रकार सांगितला.
त्यानंतर दिनांक 17 रोजी तिच्या घरच्यांनी आणि तिने मिळून चाकण पोलीस चौकीत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भादवि कलम 354(ड), गुन्हा दाखल करून त्या आरोपी तरूणास अटक केली. यासंबंधी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर बामणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की, सदर आरोपीस अटक केली असून आरोपी हा फिर्यादी मुलगी हिच्या परिसरातच राहणारा आहे आणि त्यावर कारवाई चालू आहे.