फलटण :-जुन्या भांडणाचे राग मनात धरून साखरवाडी फुले नगर येथे एकास जिवे मारण्याची धमकी.
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण:-7972521412

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
जुन्या भांडणाचे राग मनात धरून साखरवाडी फुले नगर येथे एकास जिवे मारण्याची धमकी.
प्रतिनिधी.शुभम भापकर
फलटण तालुका.साखरवाडी फुले नगर येथे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहिती नुसार दि.१३/९/२०२२ रोजी फिर्यादी रामचंद्र हनुमंत मिरेकर वय ७२ व्यवसाय मजुरी राहणार फुलेनगर साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा व फिर्यादीची सून दिव्या नात अमृता असे घरी असताना यातील आरोपी अनिल उर्फ अण्णा भीमा यमकर राहणार फुले नगर साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा हा जुने भांडणाच्या कारणावरून दारू पिऊन येऊन फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या घरात घुसून आज तुझी चांगली जिरवतो तुला लय मस्ती आली तुझं अख्खं घरदार संपवून टाकतो असे म्हणून फिर्यादीस मारहाण करून त्याच्या हातात असणारे लोखंडी गजाने फिर्यादीचे डोक्यात मारत असताना फिर्यादीने डावा हात मध्ये केला असता लोखंडी गज फिर्यादीचे हाताचे डावे अंगठ्या जवळ लागून जखम झाली आहे तसेच सदर भांडणे सोडवण्यास नात अमृता सून दिव्या या आले असता त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आहे व फिर्यादीच्या घरांतील साहित्याचे नुकसान केले आहे.पुढील तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक धोंगडे मॅडम करत आहेत