पुणे:-‘‘महाराष्ट्र पोलीस आता आपल्या एका क्लिकवर”- आयुक्त शिंदे.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
‘‘महाराष्ट्र पोलीस आता आपल्या एका क्लिकवर”- आयुक्त शिंदे.
पिंपरी, दि. 15 (शफिक शेख):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे यांनी आपल्या नागरिक स्नेही पोलीस कार्यपद्धतीचे आणखी एक उदाहरण देत पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांसाठी महाराष्ट्र सिटीझन पोर्टलद्वारे कोणत्याही प्रकारची तक्रार देण्याची सुविधा दिली उपलब्ध करून दिली आहे. https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/Index.aspx असे या पोर्टलची लिंक असून नागरिकांनी केवळ एका क्लिकद्वारे आपली कोणतीही तक्रार देता येणार आहे.
यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/Index.aspx या वेबसाईटवर जावून आपले युझरनेम आणि पासवर्ड तयार करावे लागेल. त्यानंतर या युझरनेम आणि पासवर्डचा वापर करून आपली कोणत्याही प्रकारची पूर्ण तक्रार देता येणार आहे. त्याची तक्रारीची सद्यस्थिती नागरिकांना पाहता येणार आहे. तसेच एसएमएस द्वारे नागरिकांना सूचितही करता येणार आहे.
यामध्ये नोंदणी करून पुढील सुविधा देण्यात येणार आहेत –
1. ई-तक्रार देणे.
2. तक्रारीची सद्यस्थिती पाहणे
3. भाडेकरू/पी.जी. पडताळणी विनंती
4. चारित्र्य पडताळणी विनंती
5. घटना/कार्यक्रम विनंती
6. निषेध/संप विनंती
7. मिरवणुकीची विनंती
8. नोकर पडताळणी
9. घरगुती मदत पडताळणी
10. वाहनाची चौकशी
11. गणेशोत्सव परवानगी अर्ज
12. नवरात्रोत्सव परवानगी अर्ज
13. नागरिकांची माहिती
14. नागरिकांच्या प्रतिक्रिया
15. सी-फॉर्म
नोंदणी न करता उपलब्ध सुविधा –
1. हरवलेली व्यक्ती
2. अनोळखी मृतदेह
3. महाराष्ट्रामधील गुन्हे
4. प्रकाशित केलेले प्रथम खबर अहवाल (थ्प्त्)
5. महाराष्ट्र पोलीस वेबसाईट
6. फरारी व्यक्ती
7. अटक व्यक्ती
8. मोबाईल गहाळ फॉर्म
9. डाउनलोड (अॅप्लिकेशन्स फॉर्म)
10. घरभाडेकरूची माहिती भरण्याची लिंक
ई-तक्रारीची कार्यपद्धती:-
1. आपला आयडी बनवा
2. तक्रार ऑनलाईन नोंदवा
3. तक्रारीच्या गांभिर्याच्या आधारे दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्हयाची नोंद, इतर ठाण्याशी संबंधित असल्यास ती पाठवणे तसेच चौकशी अधिकारीची नियुक्ती करणे.
4. चौकशी
5. फिर्यादीकडे केलेल्या कारवाईची माहिती कळविण्यात येईल.
सदर उपयुक्त अशा सुविधेचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन मा. आयुक्त शिंदे, अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब गोळे यांनी केले आहे.