पिंपरी :-शगुन चौकातील मोबाईलच्या दुकानाचे पत्रा 1,35,000 चा माल लंपास.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पिंपरी :-शगुन चौकातील मोबाईलच्या दुकानाचे पत्रा उचकटून 1,35,000 चा माल लंपास.
पिंपरी, दि. 8 (शफिक शेख) – पिंपरीतील शगुन चौकातील मोबाईल हब या मोबाईलच्या दुकानाचे वरील पत्रा उचकटून आणि आतील लोखंडी ग्रील ग्राईंडर मशिनच्या सहायाने कट करून अज्ञात चोरटयाने दुकानातील 85000 रूपये किमतीचे 4 मोबाईल हॅंडसेट, 25000 रूपये किमतीचे 3 मनगटी घडयाळे आणि रोख रक्कम रूपये 25000 असा एकूण 1,35,000 रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
या संबंधी दुकानाचे मालक सुमित मुलचंद चांदवानी यांनी फिर्याद दिली असून कलम 454, 457 आणि 380 प्रमाणे पोलिसांनी अज्ञान चोरटयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत.
गर्दीचा फायदा घेवून महिलेचा 40000 रूपये किमतीची चेन हिसकावली
भोसरी, दि. 8 – दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पुणे मनपा येथून भोसरी बसमध्ये प्रवास करीत असताना गर्दीचा फायदा उचलून अज्ञात चोरटयाने फिर्यादी महिलेच्या गळयातील 15 ग्रॅम वजनाची सुमारे 40000 रूपये किमतीची सोन्याची गोफची चेन चोरून नेली. भोसरी येथे उतरल्यानंतर महिलेच्या लक्षात आले त्यांनी त्वरित भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरोधात तक्रार नोंदविली. या प्रकरणचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. केंद्र करीत आहेत.
म्हाळुंगे टीव्हीएस लुक्स कंपनीसमोरून हीरो होंडा चोरीस
म्हाळुंगे, दि. 8 – येथील टीव्हीएस लुक्स कंपनीच्या गेट समोरून सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान फिर्यादी तैयब समीमअहमद हुसैन यांची हीरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम. एच. 12 जे. जे. 5829 ही अज्ञान चोरटयाने चोरून नेली.
पोलिसांनी भादवि 379 नुसार अज्ञान चोरटयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पुढील तपास पोलीस हवालदार बांगर करीत आहेत.
घटकचाचणी परीक्षेत चार विषयांत नापास झाल्याने 16 वर्षीय मुलगा घर सोडून निघून गेला
दापोडी, दि. 8 – येथील फिर्यादी रवींद्र जगदीश पिल्ले यांचा मुलगा बारावीच्या परीक्षेत घटकचाचणी परीक्षेत 4 विषयांत नापास झाल्याने नाराज होवून दि. 7 रोजी राहत्या घरातून निघून गेला आहे. परंतु फिर्यादी यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मुलाच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून कोणीतरी त्यास फूस लावून पळवून नेले आहे.
देहूरोड पोलिसांनी भादवि कलम 363 नुसार अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. भास्कर करीत आहेत.
ग्रीनफिल्ड सोसायटीमधून 7 वर्षाचा मुलगा बेपत्ता
पिंपरी, दि. 8 – मासुळकर कॉलनी मधील ग्रीनफिल्ड सोसायटीमधून गजानन श्रीकांत ओगले यांचा मुलगा आदित्य गजानन ओगले हा खेळायला बिल्डींगच्या खाली जातो असून सांगून गेला परंतु त्यानंतर खूप वेळानंतरही तो परत घरी न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता. फिर्यादीचे सोसायटी मध्ये राहणारी मुलीने त्यांनी सांगितले की आपका बेटा मिल नही रहा. त्यामुळे त्यांनी त्वरित पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली तसेच त्यांच्या मुलास कोणीतरी अज्ञाताने खाण्याचे आमिष दाखवून नेले असल्याचा फिर्यादी गोगले यांचा संशय आहे.
पोलिसांनी भादवि 363 प्रमाणे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सौ. बोबडे करीत आहेत.
बळजबरीने मिळकतीवर ताबा मारून लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण
दिघी, दि. 8 – फिर्यादी ऋषिकेश बबन साळुंके यांचे मालक श्री. जावेद अरकटे यांच्या दिघी येथील गट नंबर. 79 मधील 1 हेक्टर पैकी 60 आर पैकी 1 हेक्टर आर 27 आर या मिळकतीवर आरोपी प्रकार फुलडाले, नितीन बेल्हेकर, रोशन तालेरा आणि एक अज्ञान इसम यांनी बळजबरीने घुसून ताबा मारला आणि मिळकतीभोवती उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडचे जेसीबीच्या सहायाने नुकसान केले. फिर्यादी हे त्यांना रोखण्यासाठी गेले असता त्यांना लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दिघी पोलिसांनी याबाबत कलम 341, 324, 504, 427, 34 नुसार गून्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिंदे हे करीत आहेत.