पुणे:-वाकड परिसरात बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय करवून घेणा-यांवर कारवाई करून 5 पिडीत महिलांची सुटका.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
वाकड परिसरात बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय करवून घेणा-यांवर कारवाई करून 5 पिडीत महिलांची सुटका.
वाकड, दि. 8 (शफिक शेख) – अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने माहिती काढताना मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 6/9/2022 रोजी वाकडे पोलीस स्टेशन हद्दीत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेणा-यांवर कारवाई करण्यात आली.
दि. 6/9/2022 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी यांना वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील शॉप नं. 17/5/1, साई सागर प्लाझा, साई चौक, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर पुणे येथील केसल नावाच्या स्पा सेंटरमध्ये मुलींकडून बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळताच बनावट ग्राहकाद्वारे सापळा रचला आणि एकूण 5 पिडीत मुलींची सुटका केली. यावळी 5000 रोख, 140 रूपयांचे इतर साहित्य, 800 रूपये किंमतीचा मोबाईल फोन असा मुद्देमाल सापडला.
या कारवाईत सिमा दीपक धोत्रे वय 37, रा. शिवप्रतिष्ठान गल्ली नंबर 1 फेमस चौक, सांगवी पुणे (स्पा चालक), रमेश कुमार साहीराम वय 24 रा. राजस्थान (मॅनेजर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश श्ंिादे, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब गोळे, मा. सह. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सरोदे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुनिल शिरसाट, सुधा टोके, मारूती करचुंडे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, रेष्मा झावरे यांनी केली आहे.