ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-अशोकराव पाटील-पार्लेकर यांचे निधन.
प्रतिनिधी अभिजीत बल्लाळ कराड:-8421223931

अशोकराव पाटील-पार्लेकर यांचे निधन.
कराड ः सातारा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष (कै.) आबासाहेब पाटील-पार्लेकर यांचे पुत्र पार्ले (ता. कराड) येथील अशोकराव यशवंतराव पाटील-पार्लेकर यांचे निधन झाले. पार्ले गावासह सैदापूर, कोपर्डे जिल्हा परिषद गटावर त्यांचे वर्चस्व होते. खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते. सह्याद्री कारखान्याचे संचालक, शिक्षण मंडळाचे सदस्य, तसेच पार्लेचे उपसरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील-पार्लेकर यांचे ते वडील होत.