मायणी :-कौशल्याची जोड दिल्यास खेळात करिअर करता येते___अभय देशमुख.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा :-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
कौशल्याची जोड दिल्यास खेळात करिअर करता येते___अभय देशमुख.
मायणी प्रतिनिधी___खेळाची आवड आणि सुप्त गुणासह कौशल्याची जोड दिली असता खेळामध्ये विद्यार्थ्यांना करिअर करता येते असे मत वडूचे नगरसेवक माजी खेळाडू अभय देशमुख यांनी वडगाव येथे बोलताना व्यक्त केली वडगाव येथील जयराम स्वामी विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य गोविंद काळे होते प्राचार्य गोविंद काळे आपल्या भाषणात म्हणाली की विद्यार्थ्यांच्या अंगी वाचन संस्कृती वाढावी यासाठी प्रमुख पाहुणे पुस्तकांचे अनेक संच शाळेला भेट म्हणून दिले आहेत त्यांचा आम्ही स्वीकार करतो या कार्यक्रमास पर्यवेक्षक जयवंत घार्गे रोहिदास डगळे रमेश लहारे आप्पासाहेब जाधव यांनी खराडे सचिन पवार सुषमा घार्गे अंकिता पिसाळ विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी रोहिदास दगडे यांनी आभार मानले.