मायणी :-मायणी परिसरात गणेश चतुर्थीला वरून राजाचे आगमन.
प्रतिनिधी दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
मायणी परिसरात गणेश चतुर्थीला वरून राजाचे आगमन.
मायणी प्रतिनिधी____ चातकासारखी वाट पाहणाऱ्या मायणी परिसराला काल बुधवारी गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत पावसाने जोरदार बॅटिंग केली त्यामुळे बळीराजा सुखावला आहे या परिसरात यापूर्वी झालेल्या रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी वीस ते पंचवीस जुलै पर्यंत मूग उडीद मका यांच्या उशिरा पेरण्या केल्या होत्या सध्याही पिके फुलोऱ्यात आली असून पाण्याअभावी यांनी माना टाकल्या होत्या आता हातातली पिके वाया जातात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती परंतु प्रथम दोन तास वरातभर रिमझिम जिरवणीचा पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे आता खरीप हंगाम 70 ते 80 टक्के हातात येईलच पण रब्बी हंगामाच्या पेरण्या देखील पूर्ण होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे रात्रभर झालेल्या जिरवणीच्या पावसामुळे बळीराजाला.