आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन समारंभ संपन्न.

प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन समारंभ संपन्न.
कराड दिनांक १: -समाजसेवा हेच आमचे ब्रीद. हा ध्यास मनात घेऊनच राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी व्हावे.
समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनापर्यंत
पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. विद्यार्थ्यांनी लोकसेवेतून शिक्षण, शिक्षणातून लोकसेवा करणे अपेक्षित आहे‌.यामध्ये विद्यार्थ्यांनी समाजाला केंद्रबिंदू मानून काम करावे असे प्रतिपादन वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा.सुरेश रजपूत सर यांनी केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेत ज्या विद्यार्थ्यांच्या मनात समाजसेवा हाच ध्यास असेल त्यांनीच सहभागी व्हावे. राष्ट्रीय सेवा योजनेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.सेवाधर्म निभावण्यासाठी कोणती समितीने नेमावी या हेतूनेच राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना केली गेली. तुमच्या मनात आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. तसेच कला, विज्ञान व वाणिज्य शाखा यापैकी कोणतीच श्रेष्ठ किंवा कोणतीच कनिष्ठ नाही,सर्वांचा दर्जा समान आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी समजू नये. मिळालेल्या संधीचे सोने करा. आवडीचे क्षेत्र मिळाले नाही तर निराश न होता मिळालेल्या क्षेत्रात आवड निर्माण करा. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ एल.जी. जाधव म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ज्याच्या शरीरात भिनली आहे तोच याबद्दल बोलू शकतो. ज्यावेळी समाजात काही प्रासंगिक घटना अशा घडतात,की तेथे सैन्यदल, पोलीस दल कमी पडते अशावेळी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना योगदान देण्यासाठी संधी दिली जाते.तुमच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना उपयोगी पडते. तुमच्या मनात असणारा अहंकार, प्रतिष्ठा, वैमनस्यवृत्ती, अवघडलेपणा,भीती दूर करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करते.व अन्याया विरुद्ध लढण्यासाठी बळ देते.तरी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होऊन स्वतःला विकसित करावे.असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्रीमती भादुले व्ही. आर. यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्री के.एस‌.महाले.यांनी करून दिला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ.पी.एस. सादिगले यांनी केले‌ या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य आर.ए. कांबळे,प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी व सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button