कराड:-दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीचा मोठा बंदोबस्त.
प्रतिनिधी अभिजीत बल्लाळ कराड:-8421223931

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीचा मोठा बंदोबस्त. महाराष्ट्रभर सुरू असून कराडमध्ये पोलीस बंदोबस्त चालू आहे. यातच आपल्या एका सहकार्याचा वाढदिवस आहे असं समजल्यानंतर कराड वाहतूक शाखेचचे पोलीस नाईक श्री दिनेश भोसले यांना सहकार्यांनी वाढदिवसाचे एक अनोख गिफ्ट दिले. बंदोबस्त म्हणले की पोलीस प्रशासनावर नेहमीच ताण असतो तरी सुद्धा आपल्या सहकार्याचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करून आपले कर्तव्य कराड वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडले.
हा वाढदिवस साजरा करताना वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव साहेब तसेच पोलीस हवालदार सुरेश सावंत,शरद चव्हाण,संतोष पवार यांच्यासह वाहतूक शाखेचे बरेच अंमलदार यांनी वेळात वेळ काढून एकत्र येऊन प्रीतीसंगम पोलीस चौकी कराड या ठिकाणी वाढदिवस साजरा केला व दिनेश भोसले यांना सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या