पुसेसावळी:-राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये माता पालक संघाची मंगळा गौर उत्साहात पार पडली.
प्रतिनिधी विनोद पाटील कराड:-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये माता पालक संघाची मंगळा गौर उत्साहात पार पडली.
राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेसावळी ता.खटाव,जि.सातारा. मध्ये माता पालका साठी मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट ला मोदक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेत सर्व महिलांनी सहभाग घेतला मोदक स्पर्धेचे परीक्षक प्रमुख पाहुणे म्हणून सौ . रागिणी भोसले ,सौ.तन्वी डूबल तसेच सौ.तेजस्विनी डूबल यांनी केले तसेच सर्व महिलांनी पारंपरिक उखाणे व खेळाचा आनंद लुटला. या कार्यक्रमतून सुद्धा महिलांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमास संस्थेच्या सचिव सौ. अश्विनी सावंत व माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ. तृप्ती यादव उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.निलोफर खान मॅडम व आभार सौ.शीला जाधव मॅडम यांनी मानले तर सर्व कार्यक्रम पर्यवेक्षिका सौ. कविता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खाली व्यवस्थित पार पडला.