ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम अहमदनगर
लोहगाव (वार्ताहर )
संगमनेर तालुक्यातील चिंचपूर येथून श्री संत सूरदास महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व गावातील सर्व भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या प्रेरणेने श्री क्षेत्र चिंचपूर ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडी सोहळ्याची आयोजन करण्यात आलेले आहे.
दिंडीचे प्रस्थान शनिवार दिनांक 17 जून 2023 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून होणार आहे.
चिंचपूर पंचक्रोशीतील भावी भक्तांनी व परिसरातील भावी भक्तांनी पायी दिंडी सोहळ्याचा सहभागी होऊन हरिनामाचा उगवण्याचा आनंद घ्यावा असे आव्हान समस्त ग्रामस्थ चिंचपूरकरांनी केलेली आहे.
दिंडी सोहळ्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने देणगी स्वरूपात अन्नदान स्वरूपात मदत केलेली आहे.
दिंडी सोहळ्याचे हे प्रथमच वर्ष असल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या दिंडी सोहळ्यामध्ये गावातील तरुण पिढी भक्ती मार्गास रमणार आहे. याचाही आनंद गावकऱ्यांना झालेला आहे . दिंडीचा परतीचा प्रवासा चौदा दिवस नंतर होणारअसल्यामुळे दिडीच्याप्रवासात लागणारे सर्व साहित्य बरोबर आणावे असे आव्हान दिंडीचे आयोजकांनी केलेले आहे.