कुमठे फाटा ते भाडळे (तालुका कोरेगाव) रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
प्रतिनिधि:- विजय काळे महाराष्ट्र

कुमठे फाटा ते भाडळे सध्या चालु असलेल्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असुन याकडे (रस्ते विकास ) बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असलेचे दिसून येत आहे.
यामागचे कारण ज्यास्तीचा नफा मिळवणे हाच दिसून येत आहे. रस्त्यावर कुठलेही डांबर न वापरता सरळ खडी पसरवून त्यावर डांबर नावाला टाकून क्रशरचे बारीक तुकडे पसरले जात आहेआणि हे माणुसकीला कलंक आहे. जरा जरी बोजड वाहन रस्त्यावर आले की रस्ता उखरला जात आहे. हे काम चालु असताना त्याच्याशी संबधित अधिकारी रस्त्याची पाहणी का करत नाहीत असा खडा सवाल लोकांमधून होत आहे. अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढू शकते. त्याच्याशी संबधित काही छायाचित्र आपल्या समोर आणण्याचे काम RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी केले आहे. मा. आमदार महेश शिंदे साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घालून हे काम थांबवावे आणि अशा कॉन्ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल करावा. यांचे परवाने रद्द करावेत. रस्त्याचे काम चालु असताना बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी रस्त्याचे परीक्षण करून कामाची प्रत कशी आहे हे पाहून पुढचे काम चालु ठेवायचे की नाही याचा निर्णय घेण्याची गरज आहे. पण असे होत नाही. यामागचे कारण काय असू शकते? यामध्ये अधिकारि ही सामील आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होतो. याच्याशी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारि वर्ग यांचा लेखा जोखा बांधकाम संबधीत विभाग मंत्रालय मुंबई याच्याकडे पाठवण्याचा निर्णय RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी घेतला आहे. समाजात भ्रष्ट लोकांना कुठलीही क्षमा मिळू नये यासाठी हे असोसिएशन कार्यरत आहे.