ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पाल ग्रामपंचायतीच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा
प्रतिनिधि:- रफीक शेख

पाल ग्रामपंचायतीच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन साजरा
कराड, दि. 12 : (रफिक शेख ) : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त पाल ग्रामपंचायत यांच्यावतीने परिचारीका दिनाच्या पाल – पेंबर येथील वैद्यकीय अधिकारी व सर्व परिचारिका यांचा सत्कार करण्यात आला.
आज 12 मे “आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन” येथे साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. घोरपडे, डॉ. मकानदार, श्रीमती खैर मॅडम, श्रीमती बीचकर मॅडम, बेबीताई शिंदे, सावंतसाहेब यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मा. सुरेशतात्या पाटील, उपसरपंच सुनीलनाना काळभोर, यात्रा कमिटीचे चेअरमन प्रकाशतात्या जगताप, शंकराव शेजवळकाका, ग्रामपंचायत सदस्य सौ सुनीताताई घाडगे, प्रशांत दळवी, अरुण जगदाळे, शिवराज पाटील, धनंजय घाडगे , गणेश खंडाईत उपस्थित होते.