ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तिरंगा रक्षक च्या मार्फत कराड वाहतूक शाखेचा गौरव
प्रतिनिधि:- अमोल भोसले सातारा

*तिरंगा रक्षक च्या वतीने कराड वाहतूक शाखेचा गौरव*
कराड शहर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचारी पूजा पाटील यांनी कार्यतत्परता आणि धाडस दाखवून रुग्णवाहिकेची वाट न पाहता खासगी वाहनातून अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला दवाखान्यात पोहचवून दाखवलेल्या माणुसकी आणि धाडसाबद्दल कराड येथील तिरंगा रक्षक साप्ताहिकाच्या वतीने पुजा पाटील यांचे कौतुक करून कराड येथील वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांचा कार्यालय प्रमुख म्हणून तिरंगा रक्षक च्या वतीने तिरंगा रक्षक चा अंक देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी तिरंगा रक्षकाचे मुख्य संपादक विश्वास मोहिते,सहसंपादक संपतराव मोहिते,उपसंपादक अनिल बडेकर, आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.