लोणंद:-गणेश उत्सव काळात जातीय व धार्मिक तेढ निर्माण होतील असे देखावे करू नयेत… लोणंद पोलिस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर.
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण:-7972521412

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
गणेश उत्सव काळात जातीय व धार्मिक तेढ निर्माण होतील असे देखावे करू नयेत… लोणंद पोलिस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर.
प्रतिनिधी. शुभम भापकर
लोणंद.आज दि.22/08/2022 रोजी लोणंद पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी गणेश उत्सव अनुषंगाने गणपती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील यांची मिटींग अमृता मंगल कार्यालय लोणंद येथे घेण्यात आली. गणेश उत्सव अनुषंगाने गणेश मंडळांनी मंडप घालताना तो कोणत्याही प्रकारे रहदारीस अडथळा होणार नाही अशा पध्दतीने घालावा, गणेश मंडळातील कार्यकर्ते यांनी कायम स्वरुपी दोन कार्यकर्ते उपस्थित ठेवावेत, लाऊडस्पिकर मर्यादित आवाजात लावावेत, कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणत्याही स्वरूपाचे जातीय व धार्मिक ते निर्माण होतील असे देखावे करू नयेत अशा , शासनाने वेळोवेळी दिलेल्या अटी व नियमांचे पालन करावे अशा प्रकारच्या सुचना देण्यात आल्या. पोलीस ठाण्याच्या वतीने गणराया अवार्ड 2022 आयोजित करण्यात आला आहे त्याबाबत माहिती देण्यात आली.सदर वेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस पाटील, पत्रकार असे उपस्थित होते.