सिल्लोड तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483
सिल्लोड तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू.
सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात शुरु असुन हे अवैध धंदे बंद करण्यात यावे असे सर्वपक्षीय निवेदन उपविभाग्य पोलिस अधिकारी यांना देण्यात आले .हे निवेदन पोलिस कर्मचारी गणेश जाधव यांनी स्वीकारले .सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सट्टा पट्टा,चक्री,अवैध दारु, गाजा, अवैध वाळु,टिटली, असे प्रकारचे अवैध धंदे सध्या सिल्लोड तालुक्यात शुरु आहेत .याअवैध धंद्यामुळे गोरगरिब लोकांचे संसार उध्दवशत होत आहेत.पोलिस व महसुल प्रशासनाच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात शुरु आहेत.महाराष्ट्र विधान परिषदचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांना भेटुन सिल्लोड तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी विधान परिषदेत आवाज उठवावा अशी विनंती ही दानवे यांना करण्यात आली.तरी हे अवैध धंदे लवकर बंद करण्यात यावे असे निवेदन सर्व पक्षीय पदधिकारी तर्फे उपविभाग्य पोलिस अधिकारी यांना देण्यात आले यावेळी काँग्रेस चे बनेखाँन पठाण,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काँम्रेड सय्यद अनिस,एम आय एमचे प्रभाकर पारधे,शेख मुक्तार , फहीम पठाण ,वंचितचे कडुबा जगताप,बहुजन समाज पक्षाचे जगदीश बेदवे,प्रकाश पवार,काँग्रेसचे शहर अध्यक्ष शेख फेरोज,संभाजी बिग्रडचे काकासाहेब मोरे,नारायण फाळके,राष्ट्टावादी युवकचे तालूका कार्यअध्यक्ष शेख अमान,किसान सभेचे तालुका अध्यक्ष बाळु पाटील शिन्दे,केशवराव ढोरमारे,शेख अजिम,इरफान पठाण,साहेब पठाण,असलम मिर्झा,सय्यद शमिम,फाहिम पठाण,आदिची निवेदनावर सह्या आहेत.जर सिल्लोड तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले नाही तर सर्व पक्षीतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.