ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-साताऱ्यातआर.पी.आय. नेते महायुती तर कार्यकर्ते महाआघाडीत सामील….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यातआर.पी.आय. नेते महायुती तर कार्यकर्ते महाआघाडीत सामील….

 

सातारा दि: लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणजे उमेदवारी व प्रचार आणि योग्य उमेदवाराला केलेले मतदान असे तीन टप्प्यात आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत पण संविधानाला नेमका धोका कोणापासून आहे ? हे मात्र गुलदस्त्यात आहे. असे असताना आता सातारा लोकसभा मतदारसंघात नेते रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच आर.पी.आय. नेते महायुती तर कार्यकर्ते महाआघाडी सोबत काम करत असल्याचे सातारा लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागात दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यात भाजप प्रणित महायुतीचा घटक पक्ष म्हणून आर.पी.आय. आठवले गट हा सुद्धा एक राजकीय पक्ष आहे. पण, गेली पाच वर्ष साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आर.पी.आय.चा महायुतीच्या माध्यमातून झालेला नाही. ग्रामपंचायत पातळीवर निवडणुका या पक्षावर होत नाहीत. पण, वैचारिक भूमिका काय असते. याचे मात्र दर्शन होते.
आर.पी.आय. आठवले गटाला मानणारे सातारा जिल्ह्यातील खेड्यापाड्यात व वाड्या वस्तीमध्ये मागासवर्गीय मतदारांनी महायुतीला मतदान करावे आणि महायुतीचे उमेदवार निवडून द्यावे. असा एक खिडकी योजना कार्यक्रम आतापर्यंत राबवत होता. या कार्यक्रमाबाबत आर.पी.आय.च्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. सन्मानाची वागणूक मिळत नाही. असा टाहो फोडला.
आम्ही वेगळा विचार करू. आम्ही निवडणूक लढवू. असे छातीठोकपणाने सांगितले. आणि अखेर पुन्हा एकदा महायुतीशी जुळवले आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आर.पी.आय. आठवले गटाचे कार्यकर्ते पायात भिंगरी लावून वाड्यावस्ती पिजुन काढत आहेत.
खरं पाहता संविधान रक्षणाची जबाबदारी ही फक्त विविध गट ताटत विखुरलेल्याआ र.पी.आय.ची आहे. असं अनेकदा सिद्ध झालेले आहे. आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर संविधान बचाव…. देश बचाव…. असा बेगडी व बेबनाव करणारी नारेबाजी केली जात आहे. केंद्रीय कमिट्यांमध्ये गेल्या २० वर्षांमध्ये एकाही रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याची वर्णी लागली नाही. तीच अवस्था माथाडी कामगार म्हणून आजही रिपब्लिकन कार्यकर्ता वंचितच राहिलेला आहे .आता या गोष्टीला वीस वर्षे झाली तरी आजही एका विशिष्ट वर्गालाच माथाडी मध्ये समाविष्ट केले जात आहे. आता तर तीही जागा परप्रांतीयांनी लाटलेली आहे. त्यामुळे आर.पी.आय.चा कार्यकर्ता हा महायुती व महाआघाडीला अक्षरशः कंटाळून गेलेले आहेत. उन्हाची तीव्रता एक वेळ ते सहन करतील पण आर.पी.आय. वर झालेला अन्याय सहन करणार नाही. अशा शब्दांमध्ये आर.पी.आय.चे जावळी पाटण कराड कोरेगाव वाई महाबळेश्वर खंडाळा व सातारा तालुक्यातील कार्यकर्ते व्यथा मांडू लागलेली आहेत.
आर.पी.आय.चे नेते रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार करत आहे. असे नेते छातीठोकपणाने सांगत आहेत .खरं म्हणजे नेते किंवा कार्यकर्त्यांना कधीच सन्मानाची वागणूक मिळाली नाही असे असताना दोन्ही बाजूने प्रचार यंत्रणेत त्यांचा सहभाग म्हणजे आश्चर्य असे मतदारांना वाटत आहे.
सध्या सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा चांगलाच जोर वाढलेला आहे. तो माध्यमातून दिसून येत नसला तरी माऊथ पब्लिसिटी म्हणजे वंचितला शक्य झालं तर मत द्या आणि जर वंचित बहुजन आघाडीला मत द्यायचे नसेल तर नोटाला जाणीवपूर्वक मतदान करा .जेणेकरून सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान व लाभलेल्या उमेदवाराला घरपोच करण्याची जबाबदारी या नोटांच्या माध्यमातून झाली पाहिजे. असे आता ज्येष्ठ नागरिक व युवक पिढी बैठका व विचारमंथन सभेनिमित्त बोलू लागलेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. आरपीआयच्या मतांचा आता बाजार होणार नाही आता विचारपूर्वकच मतदान केले जाईल असा नारा दिला जात आहे.
——————————————–
चौकट- खेड्यापाड्यातील दलित वस्ती मध्ये प्रचार निमित्त उमेदवार व त्यांचे समर्थक जात आहेत ही आनंदाची बाब आहे पण शंभर दीडशे उंबरा असलेल्या कांबळे, गायकवाड ,माने, खरात, वायदंडे, साठे ,तुपे अशी नावे माध्यमातून येत नाहीत .याची खंत आता कार्यकर्ते उघडपणाने बोलू लागले आहेत. या जातीवादी प्रवृत्ती बाबत तरुण पिढी जनजागृती करत आहेत .हे या निवडणुकीचे यश मानावे लागत आहे.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button