आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निगडी पुणे:-ज्ञानदीप शाळेतील शिक्षक सचिन माळशिकरे यांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी:-9767275783

ज्ञानदीप शाळेतील शिक्षक सचिन माळशिकरे यांच्या
यकृत प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन
पुणे, निगडी, दि. 19 (शफिक शेख):- येथील ज्ञानदीप शाळेतील शिक्षक श्री. सचिन माळशिकरे यांचे सुमारे एक महिन्यापूर्वी यकृत निकामी झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. या शस्त्रक्रियेमध्ये यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याने त्यांच्या पत्नी सौ. वर्षा माळशिकरे या यकृत दाता आहेत.
सदर संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी सुमारे 23,00,000/- तेवीस लाख रूपयांची गरज आहे. ज्ञानदीप शाळेतील त्यांचे शिक्षक सहकारी, मुख्याध्यापिका, शाळेचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांचे पालक हे सर्व रक्कम गोळा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु रक्कम खूप मोठी असल्याने सर्वसामान्य जनतेकडून आणि आमच्या वाचकांकडून आर्थिक मदतीचे आवाहन केले जात आहे.
मागील अनेक वर्षांपासून कदाचित आपले पूर्ण आयुष्यच ज्ञानदानासाठी आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी वाहून घेतलेल्या सचिन सरांना आज या समाजाची ख-या अर्थाने गरज आहे. तरी सर्व नागरिक, पालक, शिक्षकगण आणि सर्व वरिष्ठांना याद्वारे आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
सदर मदतीसाठी जर कोणास आर्थिक मदत करावयाची असल्यास मिलाप ऑर्गनायजेशनच्या खालील लिंकवरून मदत करता येईल. जर कोणास खात्यावर रक्कम जमा करावयाची असल्यास खालील खाते क्रमांकावर मदत करता येईल.
https://milaap.org/fundraisers/support-sachin-malshikare/deeplink?deeplink_type=paytm
Account no. – 2223330084781900
IFSC code- RATN0VAAPIS
Account name – Sachin Malshikare – Milaap

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button