आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:- रहिमतपूर – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने रहिमतपूर शहरातून श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी च्या वतीने प्रभात फेरी.

प्रतिनिधी:- प्रमोद देवाडिगा सातारा:-9623714741

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने रहिमतपूर शहरातून श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी च्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. रहिमतपूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा.श्री. आनंदरावजी कोरे साहेब, माजी नगराध्यक्ष मा.श्री. वासुदेव माने,मुख्याधिकारी मा.श्री.संजीवनी दळवी मॅडम, मा.श्री मधुसूदन दादा मोहिते पाटील, चेअरमन, श्री गाडगे महाराज मिशन मुंबई यांच्या शुभहस्ते प्रभातफेरीचा शुभारंभ झाला.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविधतेतून एकता हा संदेश देणाऱ्या विविध वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. आश्रमशाळेतील कलापथकाने सादर केलेल्या नृत्याविष्काराचे उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज, विविध घोषवाक्याचे फलक, रंगीत फुगे घेऊन आणि देशभक्तीपर घोषणांनी रहिमतपूर शहरामध्ये देशभक्तीमय वातावरण तयार झाले. प्रभातफेरी यशस्वी होण्यासाठी माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते, प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक माने, उपाशिक्षक श्री रवींद्र मोहिते तसेच रहिमतपूर नगरपालिकेचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button