ताज्या घडामोडीदेश विदेश

औरंगाबाद:-“ पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याने मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांना महामहिम राष्ट्रपती यांचेकडुन शौर्य पदक जाहिर ….

प्रतिनिधी:- गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

संपादक :-प्रल्हाद चव्हाण :-8208717483

“ पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याने मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांना महामहिम राष्ट्रपती यांचेकडुन शौर्य पदक जाहिर ….

मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण हे सप्टेंबर/2019 ते सप्टेंबर/2021 या दरम्यान अपर पोलीस अधीक्षक म्हणुन गडचिरोली येथे कार्यरत होते.
दिनांक 18/10/2020 रोजी नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना महाराष्ट्र -छत्तीसगढ सिमेवर किसनेली गावाजवळ 60 ते 70 नक्षल असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री. मनिष कलवानिया, यांचेे नेतृत्वात सी-60 कमांडो पथकासह 15 किमी घनटाद जंगलात पायी जाऊन सर्च ऑपरेशन राबवित असतांना नक्षलांनी पोलीसांचे दिशेने जोरदार गोळीबार सुरू केल्याने तेथे प्रत्युतरात पोलीसांनीही गोळीबार सुरू केला. यावेळी मा. मनिष कलवानिया, यांचे सह त्यांचे सी-60 कमांडो पथकाने आपले प्राणाची बाजी लावुन नक्षल हल्ला परतावुन लावला. सदर ठिकाणी पोलीस आणि नक्षल यांची 8 तास भीषण चकमक चालली. यामध्ये पोलीसांचा वाढता दबाब पाहुन तेथून नक्षली पळुन गेले.
सदर ठिकाणाची पाहणी केली असता तेथे 05 जहाल नक्षलींचे मृतदेह तसेच मोठया प्रमाणावर शस्त्र, दारूगोळा,कुकर बॉम्ब, स्फोटके व ईतर नक्षली साहित्य ही मिळुन आले होते.

सदर अभियानामध्ये मा. मनिष कलवानिया, तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक (अभियान) गडचिरोली. व सोबत त्यांचे सी-60 कमांडो पथकाने यांनी टिपागड दलम, कोरची दलम,आणि प्लाटुन 15 मधील जहाल नक्षलवादीना टिपण्यात यश आले होते. सदर चकमकीमध्ये ठार झालेल्या नक्षलवादयावर 18 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

सदर साहसी आणि नक्षल चळवळीला हादरा देणा-या शौर्यपूर्ण कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांना देशाचे *महामहिम राष्ट्रपती यांचे कडुन “शौर्य पदक” Gallantry Medal जाहिर करून सन्मानित करण्यात आले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button