वाई:-(आसले)-सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे – श्री बेलदार
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे – श्री बेलदार.
यावर्षी पावसाचे प्रमाण हे जास्त आहे सध्याचे वातावरण पाहता खरीप हंगामातील पिकांच्या दृष्टीने किडींचा प्रादुर्भाव जास्त संभवतो तसेच अतिवृष्टीमुळे पिकनिकसान होण्याचा धोकाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावी व आपल्या पिकांचे विमा संरक्षण करून घ्यावे असे आवाहन श्री रवींद्र बेलदार मंडळ कृषी अधिकारी वाई यांनी केले आहे.
सदरची योजना ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे, योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मृत शेतकऱ्यांची नावे किंवा अवैध मार्गाने अर्ज केल्यास तो रद्द केला जाईल, यामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Agristack Farmer ID), ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे.
सोयाबीन पिकासाठी विमा हप्ता ३८२.५० रुपये प्रति हेक्टरी इतका आहे व नुकसान झाल्यास मिळणारी विमा संरक्षित रक्कम ३८२५० रुपये प्रति हे,भुईमूग पिकासाठी विमा हप्ता ३३७.५० रुपये प्रति हे.व विमा संरक्षित रक्कम ४५००० प्रति हे., भात पिकासाठी विमा हप्ता ५५० रूपये व विमा संरक्षित रक्कम ५५००० प्रति हे आहे.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक, सातबारा व खाते उतारा, पिक पेरा स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक व आधार कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
सदरचा पिक विमा बँक, महा-ई-सेवा केंद्र, सीएससी सेंटर या ठिकाणावरून भरता येतो.तसेच http://pmfby.gov.in या संकेतस्थळावरून शेतकरी स्वतःही भरू शकतात. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत ही ३१जुलै २०२५ ही आहे त्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपला विमा भरून आपले पीक विमा संरक्षित करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.