फलटण:-गिरवी आरडगांव व फरांदवाडी केंद्रात विविध उपक्रम: अनिल कदम
प्रतिनिधी विनोद पाटील:-9762274165

गिरवी आरडगांव व फरांदवाडी केंद्रात विविध उपक्रम: अनिल कदम
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त फलटण तालुक्यातील गिरवी आरडगांव व फरांदवाडी केंद्रातील विविध जिल्हा परिषद शाळा, खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यम शाळा यामध्ये हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव उपक्रम जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी, निबंध स्पर्धा,भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या विषयावर विद्यार्थी यांच्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील गिरवी आरडगांव व फरांदवाडी केंद्रातील उपक्रमशील व प्रयोगशील केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी सांगितली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार गिरवी निरगुडी धुमाळवाडी बोडकेवाडी आरडगांव हिंगणगाव सासवड तांबवे सालपे चव्हाणवाडी हिंगणदरा शेरेचीवाडी धनगरवाडी परहर गायकवाडवस्ती चांभारवाडी चाहुरमळा गुरवदरा जननीमळा जाधववाडा माळेवस्ती हराटीमळा फरांदवाडी ठाकुरकीमळा उंळुब नवामळा वाठारमळा गोळेगाव गोळेवाडी भोंगळेवस्ती तरटेवस्ती जुनागांव वाठार निंबाळकर मिरगांव तावडी बंडगरवस्ती दरुबाईवस्ती या शाळांनी शाळेत हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव उपक्रम जनजागृती करण्यासाठी गावांमध्ये वाडी वस्तीत प्रभातफेरी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे पालक व शाळा व्यवस्थापन समिती बैठक घेण्यात आली आहे महिला मेळाव्यात हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव उपक्रम जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे विविध प्रकारच्या शैक्षणिक विकासासाठी विद्यार्थी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत
या विविध प्रकारच्या माध्यमातून समाजप्रबोधन व लोकजागृती जनप्रबोधन करण्यासाठी नियोजन व कार्यवाही करण्यात आली आहे.अशी माहिती केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी सांगितली आहे.