ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निगडी :-ज्ञानदीप प्राथमिक शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे :-9767275783

ज्ञानदीप प्राथमिक शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा.
पुणे, निगडी, दि. १० (शफीक शेख) :- रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप विद्यामंदिर रुपीनगर येथील इयत्ता पहिली क या वर्गात भावा बहिणीचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
लहान वयातच विद्यार्थ्यांना भावा बहिणीचे अतूट नाते समजावे संस्कार व्हावेत व रक्षाबंधन हा सण का साजरा करावा याविषयी वर्गशिक्षक देवरे महेंद्र यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
सदर कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. नवले मॅडम, संचालक श्री. भालेकर आणि शाळेच्या इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले.