पारनेर:-सुपा बैठकीत शिक्षकांच्या वेदनांचा उद्रेक… आता एकजुटीने संघर्ष अटळ!
पत्रकार राजेंद्र चितळकर पारनेर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-सुपा बैठकीत शिक्षकांच्या वेदनांचा उद्रेक… आता एकजुटीने संघर्ष अटळ!

_आज सुपा व परिसरातील शिक्षक समन्वय बैठकीत शिक्षकांच्या मनातील असंतोषाला वाचा फुटली. विशेषतः महिला शिक्षिकांनी मांडलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाच्या व्यथा मन हेलावून टाकणाऱ्या होत्या._
_अनावश्यक अशैक्षणिक कामांची सक्ती, रात्री-अपरात्री येणारे ऑनलाइन आदेश, सततचे अहवाल आणि मानसिक तणाव यामुळे शिक्षकांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे._
आजची बैठक केवळ तक्रारींची नव्हती, तर अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढण्याचा निर्धार करणारी होती!
_आपण कोणाच्या विरोधात नाही, आपण अन्यायाच्या विरोधात आहोत. काम टाळायचे नाही, तर शिक्षकांना सन्मानाने विद्यार्थ्यांना शिकवता यावे, हीच आपली भूमिका आहे._
🚩 ४ नोव्हेंबरचा मोर्चा हा प्रत्येक शिक्षकाच्या स्वाभिमानाचा आणि अध्यापनाच्या हक्काचा आवाज आहे!
✊ शिक्षकांना सन्मान द्या!
✊ मानसिक छळ थांबवा!
✊ अशैक्षणिक कामे बंद करा!
✊ शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवू द्या!
📅 ४ नोव्हेंबर २०२६ | बुधवार
📍 जिल्हा परिषद कार्यालय, अहिल्यानगर
आज सुपा बोलले आहे… उद्या संपूर्ण पारनेर बोलणार… आणि ४ नोव्हेंबरला संपूर्ण जिल्हा एकजुटीची ताकद दाखवणार!
🚩 एक शिक्षक – एक आवाज – एक संघर्ष – एकजूट!
🙏 शिक्षकांच्या सन्मानासाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊया!




