अंधेरी पूर्व:- मुंबईत ‘हायड्रो गांजा’ विक्री करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांचा दणका! एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; १ किलो ८९६ ग्रॅम अमली पदार्थ जप्त, किंमत ६६ लाख ३६ हजार रुपये!
पत्रकार संदेश ऊनवरकर मुंबई शहर सचिव

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

अंधेरी पूर्व:- मुंबईत ‘हायड्रो गांजा’ विक्री करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांचा दणका!
एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; १ किलो ८९६ ग्रॅम अमली पदार्थ जप्त, किंमत ६६ लाख ३६ हजार रुपये!

साताऱ्यातून मुंबईत अमली पदार्थांची विक्री; ठाणे पोलिसांनी टाकला छापा, दोन आरोपी जाळ्यात आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त!
मुंबई | प्रतिनिधी | RPS STAR NEWS
मुंबई शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत ‘हायड्रो गांजा’ या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ किलो ८९६ ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा, अंदाजे ६६ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणजित गोंदके व अमली पदार्थविरोधी पथक हे अमली पदार्थांचे सेवन, खरेदी-विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास जे. के. इंडस्ट्रियल इस्टेटजवळ, पेपर बॉक्स रोड, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई येथे दोन इसम संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी संशयावरून दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे ‘हायड्रो गांजा’ हा अमली पदार्थ असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण १ किलो ८९६ ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा आढळून आला. त्याची किंमत अंदाजे ६६ लाख ३६ हजार रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे १) ओंकार राजेंद्र पवार (वय २८ वर्षे), रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा आणि २) पियुष मधुकर शिंगाडे (वय २२ वर्षे), रा. बाळगाव स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा, अशी आहेत.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपींना हा अमली पदार्थ कोठून मिळाला आणि त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा तपास पोलीस करत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित गोंदके व त्यांच्या पथकाने केली. अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
RPS STAR NEWS — निर्भीड पत्रकारिता, जनहितासाठी कटिबद्ध!




