मंत्रालय, मुंबई – श्रीगोंदा-नगरच्या विकासासाठी विक्रमदादा पाचपुते यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट.
पत्रकार राधाजी व्यवहारे श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मंत्रालय, मुंबई – श्रीगोंदा-नगरच्या विकासासाठी विक्रमदादा पाचपुते यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट.

मुंबई :-श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांबाबत आमदार विक्रमदादा बबनराव पाचपुते यांनी आज मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी आमदार पाचपुते यांनी मतदारसंघातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विविध विभागांशी संबंधित असलेल्या प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदने सादर केली. लेखी निवेदनाद्वारे त्यांनी या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली.
*मुख्यमंत्र्यांनी दिल्या तात्काळ सूचना*
आमदार पाचपुते यांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती आमदार पाचपुते यांनी दिली.
*जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध*
यावेळी बोलताना आमदार विक्रमदादा पाचपुते म्हणाले, “मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत, शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा आणि विकासकामांना गती मिळावी, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. जनतेच्या प्रश्नांची दखल घेऊन त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याची मा. देवाभाऊंची कार्यपद्धती नेहमीच प्रेरणादायी आहे. श्रीगोंदा-नगरच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.”
या भेटीमुळे श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील अनेक प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
—




