जोगेश्वरी:-(मुंबई) – २१ वर्षांपासून फरार असलेल्या जाहिरनाम्यातील आरोपीला जोगेश्वरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
पत्रकार संदेश उनवरकर मुंबई शहर सचिव

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण- 8208717483

जोगेश्वरी:-(मुंबई) – २१ वर्षांपासून फरार असलेल्या जाहिरनाम्यातील आरोपीला जोगेश्वरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
न्यायालयात हजर राहत नव्हता, नाव बदलून नव्हे तर ठिकाण बदलून पोलिसांना देत होता गुंगारा; अखेर नाशिकमधून घेतले ताब्यात!
मुंबई | प्रतिनिधी
गेल्या २१ वर्षांपासून न्यायालयात हजर न राहता फरार असलेल्या जाहिरनाम्यातील आरोपीला जोगेश्वरी पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला अखेर कायद्याच्या कचाट्यात आणण्यात आले आहे.
राजू असई शेख (वय ४६ वर्षे), रा. सह्याद्री सिमेंट, विटलवाडी, नाशिक, महाराष्ट्र, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३/२००५ अन्वये भारतीय दंड संहितेतील कलम ३०४(अ), ३३८, ३३७ तसेच मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल होता. या प्रकरणात आरोपी सुमारे २१ वर्षांपासून न्यायालयात हजर राहत नसल्याने मुंबईतील अंधेरी येथील मा. १०वे न्यायालय, बृहन्मुंबई यांनी त्याच्याविरुद्ध जाहिरनामा घोषित केला होता.
दरम्यान, आरोपी सध्या नाशिक येथील एका सिमेंट प्लांटमध्ये काम करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढण्यात आला. त्यानंतर नाशिक तालुका ग्रामीण पोलीस ठाणे व जिल्हा नाशिक येथे आवश्यक कायदेशीर नोंद करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पुढे त्याला अंधेरी येथील मा. १०व्या न्यायालयात हजर करण्यात आले.
👮 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (का. व सु.) तसेच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पश्चिम प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि जोगेश्वरी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी व अंमलदार यांच्या प्रयत्नांमुळे ही कामगिरी यशस्वी झाली.
२१ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन त्याला न्यायालयासमोर हजर करण्याची जोगेश्वरी पोलिसांची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
RPS STAR NEWS | मुंबई




