कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीतील वांजरगाव, खानापूर ,कमलपुर नाऊर बंधारे तत्काळ पूर्ण क्षमतेने भरून न दिल्यास लाभधारक शेतकरी गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी गोदावरी नदीत सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार !!!

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

  श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीतील वांजरगाव, खानापूर ,कमलपुर नाऊर बंधारे तत्काळ पूर्ण क्षमतेने भरून न दिल्यास लाभधारक शेतकरी गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी गोदावरी नदीत सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार !!!

गोदावरी नदीवरील वांजरगाव खानापूर कमलपुर नाऊर येथील केटी बंधाऱ्यावर सरला, गोवर्धन ,रामपूर ,महांकाळ वडगाव, खानापूर, भामाठाण, नागमठाण,अव्वलगाव, हमरापुर बाजाठाण शनिदेव गाव चांदेगाव डाग पिंपळगाव भालगाव वांजरगाव या गावांचा पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे तसेच श्रीरामपूर व वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील किमान शंभर गावांना विहिरी अधिगृहीत करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे सदर चारही बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध असणे हा केवळ शेतीचा प्रश्न नसून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नागरीक शेतकरी व पशुधनाची पाण्याची गरज लक्षात घेऊन वांजरगाव खानापूर कमलपूर नाऊर हे चारही बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावेत.


नांदूर मधमेश्वर येथून यापूर्वी विविध बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे मात्र सदर पाण्याचा अपेक्षित लाभ वांदरगाव खानापूर कमलपूर नाव या चार बंधाऱ्यांना पुरेशा प्रमाणात मिळालेला नाही त्यामुळे सोडण्यात आलेल्या पाण्याचे नियोजन प्रत्यक्ष प्रवाह व या चारही बंधाऱ्यांसाठी करण्यात आलेली तरतूद याबाबत जलसंपदा विभागाने स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे.


गोदावरी नदीच्या वरील भागातील मोठी धरणे मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत या धरणांमधून पाणी सोडले जाते त्यावेळी त्याचा प्रवाह खालील भागात येऊन अनेक वेळा पुरपरिस्थिती निर्माण होते या पूरस्थितीचा फटका खालील भागातील नागरिक व शेतकऱ्यांना सहन करावा लागत असेल तर त्याच गोदावरी च्या पाण्याचा आवश्यक व न्याय वाटा खालील भागातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मिळणे आवश्यक आहे.
म्हणून जलसंपदा विभागाने वडील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून वांजरगाव खानापूर कमलपुर नाऊर, येथील केटी बंधाऱ्यांना तात्काळ पाणी उपलब्ध करून देऊन पूर्ण क्षमतेने भरून देण्याची कार्यवाही करावी.


प्रमुख मागण्या:

१) वांजरगाव, खानापूर, कमलपुर, नाऊर हे चारही बंधारे तत्काळ पूर्ण क्षमतेने भरून मिळावेत.
२) नांदूर मधमेश्वर येथून केटी बंधाऱ्यांसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याची एकूण मात्रा, वेळ ,कालावधी, याची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी.
३) नांदूर मधमेश्वर येथून सोडण्यात आलेल्या पाण्यापैकी वांजरगाव खानापूर कमलपूर या चार केटी बंधाऱ्यापर्यंत अपेक्षित किती पाणी पोहोचणे आवश्यक होते याची माहिती व विभागाने केलेले नियोजन स्पष्ट करण्यात यावे.
४) नांदूर मधमेश्वर येथून पाणी सोडूनही वरील चार बंधाऱ्यांमध्ये अपेक्षित पाणी का पोहोचले नाही याची कारणमिमांसा करून त्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
५) पुढील चारही केटी बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी जलसंपदा विभागाने कोणते नियोजन, नियंत्रण व उपाययोजना केल्या त्याची माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी.
६) श्रीरामपूर वैजापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त किमान शंभर गावांची पिण्याच्या पाण्याची पशुधनाच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन या चारही बंधाऱ्यांमध्ये आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यात यावे.
७)TAIL TO HEAD (शेवटपासून – सुरुवातीपर्यंत) केटी बंधारे भरण्याचा कायदा, नियम असताना देखील वरच्या भागातील बाहुबली नेत्यांनी बंधाऱ्यांच्या फळ्या काढल्याच नाहीत आपल्या श्रामपूर वैजापूर तालुक्यातील चार कोल्हापूर बंधारे वरच्या बाहुबली नेत्यांनी प्रशासनाला आताशी धरून नियम मोडल्याने दोन वेळा धरणातून पाणी सोडूनही बंधारे कोरडेच राहिले हे अत्यंत दुर्दैवी आहे.
*आमची स्पष्ट भूमिका:*
पाण्याचा प्रश्न हा कोणत्याही एका गावाचा किंवा तालुक्याचा प्रश्न नसून सामान्य नागरिकांच्या पिण्याच्या व पशुधनाच्या पाण्याचा व शेतीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. वडील भागातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असताना खालील भागातील गावांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही परिस्थिती निश्चितच अन्यायकारक आहे पुराच्या वेळी खालील भागाने पाण्याचा फटका सहन करायचा आणि पाणी उपलब्ध असताना त्याच भागातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवायचे हे आम्हाला मान्य नाही त्यामुळे वडील चारही केटी बंधारे तत्काळ पूर्ण क्षमतेने घडून देण्यात यावेत ही आमची ठाम मागणी आहे.
*सामूहिक आत्मदहन आंदोलनाचा इशारा !!*
वडील मागणी आवडतात का ठोस कार्यवाही करुन वांजरगाव, खानापूर ,कमलपुर, नाऊर हे चारही बंधारे पूर्ण क्षमतेने भरून दिले नाहीत तसेच सोडलेल्या पाण्याबाबत योग्य कार्यवाही केली नाही तर शेतकरी संघटना व श्रामपूर व वैजापूर तालुक्यातील या बंधाऱ्यांचे लाभधारक शेतकरी यांच्यावतीने गुरुवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२६ रोजी सकाळी दहा वाजता गोदावरी नदीपात्रात महांकाळ वडगाव नागमठाण रोडवरील नदीपात्रातील पुलाजवळ सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी जनसंपदा विभाग व संबंधित प्रशासनाची राहील याची गंभीर्याने नोंद घ्यावी त्यामुळे सदर निवेदनाची तातडीने दखल घेऊन वांजरगाव खानापूर कमलपुर नाव हे चारही केटी बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्याची कार्यवाही करावी, असे निवेदन शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगर व बंधाऱ्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांकडून देण्यात आले.
या निवेदनावर श्री निलेश शेडगे,जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष,अहिल्यानगर शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती सुनिताताई वानखडे , नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी, मधुकर काकड, अर्जुन दातीर, विष्णू भनगडे, संतोष दातीर ,नामदेव घोगरे, बाळासाहेब घोगरे, रमेश आव्हाड, संजय भनगडे ,प्रदीप वानखडे ,रवींद्र वानखडे, अंबादास गमे ,पोपटभाई शेख, संजय बनगया, संदीप आदिक, गणेश आदिक, निलेश आदिक, भरत गलांडे, नानासाहेब पवार, रोहिदास पवार, सद्दाम शेख, सुनील बनसोडे ,मयूर भनगडे, राम महांकाळे , नारायण चोरमल, गोविंद बडाख, योगेश पवार ,अशोक कारले ,विजय चोरमल, गणेश सोमवंशी, अशोक आव्हाड, राहुल कारले, शिवाजी जाधव आदीसह बंधाऱ्यांच्या शेकडो लाभधारक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button