सातारा:-वाईत गुटखा विक्रीला पुन्हा उधाण! अन्न व औषध प्रशासन विभाग गाफील का? देवाणघेवाणीच्या चर्चेला वाईत उधाण.! – सातारा जिल्हा FDA प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.!
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-वाईत गुटखा विक्रीला पुन्हा उधाण! अन्न व औषध प्रशासन विभाग गाफील का? देवाणघेवाणीच्या चर्चेला वाईत उधाण.! – सातारा जिल्हा FDA प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.!

सातारा वाई, प्रतिनिधी :
वाई शहरासह वाई तालुक्यातील काही भागांत अनेक ठिकाणी गुटखा विक्री पुन्हा सुरू असल्याची पहावयास मिळत आहे. गुटखा विक्रीवर बंदी असतानाही अशा प्रकारची विक्री होत असल्याचे खरे असेल, तर संबंधित यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. मात्र, वाई शहर व परिसरात अशा पदार्थांची विक्री होत असल्याचे पहावयास मिळत आहे. संबंधितांवर कारवाई केली जात आहे का, याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळण्याची अपेक्षा आहे जर कारवाई केली जात आहे तर पुन्हा विक्री कशी होत आहे यामुळे जिल्हा F.D.A. प्रशासनानच्या कार्य क्षमतेवर आक्षेप घेतला जात आहे यात किती आर्थिक देवाणघेवाण होत आहे असा सवाल ही नागरिक उपस्थित करत आहेत.
गुटखा विक्रेत्यांवर कारवाई कधी?
शहरातील पानटपऱ्या, किरकोळ विक्रीची दुकाने आणि इतर संभाव्य विक्री केंद्रांची तपासणी करून प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होतो, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता पुरवठा साखळीतील प्रमुख गुटखा किंग यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
आर्थिक देवाणघेवाणीच्या चर्चेची चौकशी होणार का?
गुटखा विक्री आणि संबंधित यंत्रणेच्या कामकाजाबाबत शहरात विविध चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. अधिकारी आणि कथित गुटखा किंग आर्थिक देवाणघेवाण होते का, असा संशय काहींकडून व्यक्त केला जात असला, तरी या आरोपांना पुष्टी देणारे ठोस पुरावे सार्वजनिकरीत्या समोर आलेले नाहीत. मात्र काही कारवाया होऊन सुद्धा पुन्हा गुटखा विक्री होत आहे त्यामुळे हे नाकारता ही येणार नाही.त्यामुळे याची वरिष्ठ विभागाकडून निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. अशी मागणी वाईकर नागरिक करत आहेत.




