ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-वाईत मनसेचा पुन्हा ‘झंजावात’! राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत तरुणांचा मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

   वाई:-वाईत मनसेचा पुन्हा ‘झंजावात’! राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत तरुणांचा मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश; सारंग माने यांच्यासह नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी.

सातारा | वाई, दि. ०७ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाई तालुक्यात संघटनात्मक ताकद वाढविण्यास सुरुवात केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत वाई तालुक्यातील अनेक तरुणांनी मनसेमध्ये प्रवेश केला. सारंग माने यांच्यासह विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे वाई तालुक्यात मनसेच्या संघटनात्मक विस्ताराला नवे बळ मिळाले आहे.
हा पक्षप्रवेश सातारा जिल्हा संपर्कप्रमुख गणेश आप्पा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली, सातारा जिल्हाध्यक्ष युवराज दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वाई विधानसभा अध्यक्ष मयुर दादा नळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
यावेळी वाई तालुक्यातील विविध पक्षांशी संबंधित अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. आगामी काळात वाई तालुक्यात मनसेची आक्रमक संघटनात्मक बांधणी करून सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय आणि हक्कासाठी आवाज उठविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ठामपणे भूमिका घेत, राज ठाकरे यांचे विचार घराघरांत पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
दरम्यान, पक्षात नुकताच प्रवेश केलेले सारंग माने यांची वाई तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. सार्थक कोंढाळकर यांच्यावर वाई तालुका संघटक पदाची, तर हर्षद हरचुंदे (मेणवली) यांच्यावर वाई पश्चिम विभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास वाई तालुका मनसे मार्गदर्शक संजय भाऊ गायकवाड, वाई शहर संघटक दीपक भडंगे, वाई तालुका सोशल मीडिया अध्यक्ष वैभव जाधव, सातारा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गरड, विद्यार्थी सेना सातारा तालुका अध्यक्ष सौरभ झेंडे, सातारा तालुका उपाध्यक्ष सनी काकडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि तरुणांच्या वाढत्या सहभागामुळे वाई तालुक्यात मनसेच्या आगामी राजकीय वाटचालीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button