श्रीरामपूर:-जलसंपदा मंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीत ७ नंबर अर्ज पाणी वाटपात समान न्याय द्या – जिल्हाध्यक्ष औताडे
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-जलसंपदा मंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीत ७ नंबर अर्ज पाणी वाटपात समान न्याय द्या – जिल्हाध्यक्ष औताडे पाणी न मिळण्याच्या भीतीने पाटबंधारे विभागाला शेतकऱ्यांची आर्त साद.

माळेवाडी ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी )भंडारदरा धरणाचे खरिपाचे आवर्तन सुरु होऊन जवळपास वीस दिवस झाले आहेत.परंतु अद्याप एन बी शाखेला पाणी मिळालेले नाही भंडारदरा सिंचन प्रणालीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी आढावा बैठकीत तीन दिवसात कालवा बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे समजल्याने एमबी शाखेवरील १४ गावचे शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली वडाळा उपविभागाच्या कार्यालयात जमा झाले यावेळी शेतकऱ्यांनी सकाळी दहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत तीन तास या आंदोलन केले पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात आंदोलनकर्त्यांनी उपकार्यकारी अभियंता संजय कलापुरे यांना पाणी न मिळाल्याचे निवेदन देऊन यांनी शाखेवरील सिंचन झाल्याशिवाय कालवे बंद करू नका अशा सूचना केल्या यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी कार्यकारी अभियंत्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय ठिय्या आंदोलन स्थिगित जाणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे अहिल्यानगरहून कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन सर्वांचे शेती सिंचन पूर्ण केल्याशिवाय धरण बंद केले जाणार नाही असे आश्वासित केले यात दूरध्वनी द्वारे जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील यांना फोनवरून एन बी शाखेवरील सर्व शेतकऱ्यांचे भरणे करून देण्याच्या सूचना दिल्या व आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना केलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अनिल औताडे , सुदामराव औताडे , शैलेश वमने ‘ गोविंदराव वाघ , सतीश नाईक , दिलीप औताडे , आधी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अशोक कारखान्याचे संचालक विदेश गलांडे ‘ बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुदे ‘ बाळासाहेब नाईक बाबासाहेब नाईक किरण ताके , योगीराज गलांडे अन्सार इनामदार दादासाहेब उमाप बाबासाहेब औताडे , देविदास वमने ‘ दत्तात्रय तारडे , रामेश्वर वमने ‘ विकास सरोदे ‘ संदीप पवार ‘ पांडुरंग राऊत राजेंद्र राऊत , मुनीर इनामदार , विलास भालदंड ‘ बंडू पाटील ताके ‘ नामदेव निकम , सोपान औताडे सरंपच माळेवाडी , गणेश वमने ‘ डिगंबर औताडे , संभाजी ताके , भागचंद औताडे , सुनील विधाटे ‘ राजेंद्र विधाटे , सूर्यभान चौधरी , निलेश सरोदे , संजय पगारे पत्रकार , सोमनाथ वमने , आधी शेतकऱ्यांची निवेदनावर सह्या करून आंदोलनात सहभाग नोंदविला …
तीन तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर आमदार हेमंत ओगले व नगराध्यक्ष करण दादा ससाने त्यांनीही उपस्थितता दर्शवून आंदोलनात सहभाग नोंदविला दिलेल्या निवेदनात म्हटले की एनबी शाखेवरील शेतकऱ्यांनी नमुना नंबर ७ चें पाणी अर्ज भरलेले आहेत सदर अर्जाचा विचार का होत नाही आज रोजी बेलपिंपळगाव ते निळवंडे पर्यंत सर्व शाखेवरील सर्व चाऱ्यांचे भरणे चांगल्या प्रकारे झाले आहेत अशा परिस्थितीमध्ये एनबी शाखेला अद्याप पाणी मिळालेले नसून चाऱ्या ओल्या ही झालेल्या नाही एनबी शाखा ची भंडारदर्याच्या सिंचन प्रमाणे येत नाही कायभंडारदरा आणि निळवंडे धरण पाणीसाठा जवळपास २० टीएमसी असताना अखेर तीन टीएमसी पाणी खर्च होत आहे जलसंपदा विभागाने १००० हजार कीसेकने विसर्ग प्रवरा नदीत सोडण्याचा ही निर्णय घेतला आहे एप्रिलमध्ये झालेल्या उन्हाळी आवर्तनात सुद्धा नेवासा तालुका व श्रीरामपूर तालुक्यातील काही चाऱ्यांचे सिंचन बऱ्याच पैकी झालेली होते याच वेळी श्रीरामपूरच्या वरील भागातही शेतीसाठी पाणी वापर झालेला होता बहुतांश गाव तळ्यांना ही नंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पाणी देण्यात आले त्यावेळी सुद्धा त्यांनी शाखेला सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी दिले गेले नाही तसेच पाटबंधारे विभागाच्या एन बी शाखेवरील चारीला एक थेंबही पाण्याचा मिळालेला नव्हता यापूर्वीही २०१२ , २०१५ , व २०१९ मध्ये ही असाच अन्याय पाटबंधारे विभागाकडून एन बी शाखेवरील शेतकऱ्यां वर झाला असून यावेळी ही २७३ हेक्टर सिंचन पाणी असून देखील पाटबंधारे विभागाने केले नसल्याचे लेखी दिलेले आहे म्हणू जेच सिंचन प्रणालीच्या नमुना नंबर ७ अर्जाला संविधनिक महत्व नाही काय असा ही सवाल उपस्थित होत आहे.
लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही सातत्याने श्रीरामपुर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे च्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अन्याय केलेला आहे
त्यामुळे मा ना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री विखे पाटील साहेब यांना श्रीरामपुर तालुक्यातील एनबी शाखेच्या शेतकऱ्यांच्या वतीने समान न्यायाची मागणी करण्यात येत आहे सदर मागणीचा दुष्काळी परिस्थितीत विचार होऊन एनबी शाखेवर अवलंबन असलेल्या 30 टक्के तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षाही शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली एनबी शाखेवरील लाभ धारक शेतकत्यांना व माळेवाडी , उंदीरगाव , माळवाडगाव , मुळेवाडगाव , खानापूर , वडाळा महादेव ‘ शिरजगाव , ब्राम्हणगाव , सराला ‘ खैरी निमगाव , दिघी भेर्डापूर , भैरवनाथ नगर , वडाळा , महांकळ वाडगाव ‘ आदी गावच्या शेतकऱ्यांना व ग्रामपंचायतींच्या तळव्यांना पाणी न मिळाल्यास तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना मोठ्या प्रमाणात करावा लागेल तसेच उभी असलेली ऊस पिके व चारा पिके आजच जळून खाक होतील शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नसून दावणीला असले ली जनावरे मातीमोल भावाने विकण्या ने प्रवरेवरील केटी प्रमाणे एनबी शाखेवरील तळेही शेती सिंचना बरोबरच भरून द्यावीत अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने पाटबंधारे कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली सदर न्याय मागणीचा विचार प्रशासन कडून झाल्यास ज्यावेळी चाऱ्य बंद पडतील त्याचवेळी उपविभाग यांच्या कार्यालयात या आंदोलन करणार असल्याचा इशाराही उपास्थित शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांना दिला.




