श्रीरामपूर:-माळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री चक्रधर स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-माळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री चक्रधर स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न.

माळेवाडी ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी येथे श्री चक्रधर स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास मा . सरपंच सोपान औताडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीष भाऊ गायकवाड उपाध्यक्ष मनिषा सागर औताडे सामाजिक सलोखा जपणारे श्री कचरू पाटील औताडे , रामदास पाटील वमने , सुदाम औताडे प्राध्यापिका डोके आदी मान्यवर उपस्थित होते उपास्थित मान्यवरांचे स्वागत थोरात सर यांनी केले यावेळी शेख सर यांनी श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्यावर व विचारांवर सखोल प्रवचन देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी जाधव मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .
यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




