कृषी व व्यापारक्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टिम वाजवणे भोवले; शिवराय युवा मित्र मंडळाच्या अध्यक्षासह साऊंड मालकावर गुन्हा!

पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टिम वाजवणे भोवले; शिवराय युवा मित्र मंडळाच्या अध्यक्षासह साऊंड मालकावर गुन्हा!

श्रीरामपूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी ध्वनीप्रदूषणाचा पोलिसांकडून दणका; साऊंड सिस्टिम जप्त, मालकाला ₹१५ हजारांचा दंड
श्रीरामपूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीत पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टिम वाजविणाऱ्या दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत, श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक ३, बालिका विद्यालयाजवळील शिवसर्कल चौक येथे आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गणेशमूर्ती आगमन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान शिवराय युवा मित्र मंडळाच्या अल्पवयीन अध्यक्षासह शिवबाजा साऊंड सिस्टिमचे मालक निलेश दादू पाटील यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी टाटा एस ट्रक क्रमांक MH 46 AF 6580 वर साऊंड सिस्टिम लावून अत्यंत कर्णकर्कश आवाजात गाणी वाजविली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण झाले. मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांनी वेळोवेळी आवाज कमी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, त्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम सुरू ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७०, २९२ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलम १८२(A)/१९(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित साऊंड सिस्टिम जप्त केली असून, मा. आरटीओ, श्रीरामपूर यांच्या मार्फत साऊंड सिस्टिमच्या मालकाला ₹१५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमका, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विशाल चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली API रामचंद्र शिंदे, PSI आप्पासाहेब हंडाळ, सफौ. दीपक कदम, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, पंकज सानप, ज्ञानेश्वर वाघमोडे आदींनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस कर्मचारी पांडुरंग चौधरी करीत आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button