वाई:-मोहडेकरवाडी:-ग्रामीण महिलांना कुक्कुटपालनातून रोजगाराची संधी.
पत्रकार गीत बांदल सुरूर विभाग प्रमुख ( HOD)

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-मोहडेकरवाडी:-ग्रामीण महिलांना कुक्कुटपालनातून रोजगाराची संधी.

सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे मोहोडेकरवाडी व वहागावातील महिलांना कुक्कुटपालन साहित्याचे वाटप.

मोहोडेकरवाडी, दि. १२ सप्टेंबर २०२६ : ग्रामीण व गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या वतीने मोहोडेकरवाडी व वहागाव येथील महिलांसाठी कुक्कुटपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या महिलांना प्रत्येकी ९ कोंबड्या व १ कोंबडा, अशी एकूण १० ४५ दिवसांची पिल्ले देण्यात आली. त्यासोबत १२ किलो खाद्य, टॉनिक तसेच आवश्यक अँटिबायोटिक पावडर देण्यात आली. या माध्यमातून महिलांना शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून, कुक्कुटपालनातून मिळणारे उत्पन्न त्यांच्या घरखर्चाला हातभार लावण्यास मदत होईल, असा संस्थेचा उद्देश आहे.
महिलांना देण्यात आलेले पक्षी जीत ॲग्रो फार्म, मोहोडेकरवाडी येथून निवडण्यात आले. फार्ममधील निरोगी, कणखर व व्यवसायासाठी योग्य पक्ष्यांची निवड करून ते लाभार्थी महिलांना देण्यात आले.
हा उपक्रम सेवा सहयोग फाउंडेशनचे संचालक शैलेशजी घाटपांडे सर, तसेच अक्षय सोनवणे सर, चंदन देशमुख सर आणि श्रीनिवास जामदाडे सर यांच्या मोलाच्या मार्गदर्शन व भक्कम पाठिंब्यामुळे यशस्वीरित्या संपन्न झाला. तसेच फाउंडेशनच्या स्वयंसेविका कविताताई साठे मॅडम आणि अर्चना टिके मॅडम यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी गावातील ग्रामस्थ व लाभार्थी महिलांनी सेवा सहयोग फाउंडेशनचे प्रमुख कार्यकारी, कर्मचारी व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. उपलब्ध करून देण्यात आलेल्या रोजगाराच्या संधीचा योग्य उपयोग करून कुक्कुटपालन व्यवसाय पुढे नेऊन यशस्वी होण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला.
या उपक्रमासाठी जीत ॲग्रो फार्मचे सर्वेसर्वा जीत शिवाजी बांदल यांनीही विशेष सहकार्य केले.
ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सेवा सहयोग फाउंडेशनचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.




