पुणे:-आंबेगाव पोलीस स्टेशनची कौशल्यपुर्ण कामगिरी.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-आंबेगाव पोलीस स्टेशनची कौशल्यपुर्ण कामगिरी.

गोळीबार करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अटक, तीन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे हस्तगत.
दि. ०५/०९/२०२६ रोजी रात्रौ ०१/३० वा चे सुमारास फिर्यादी यांचा मुलगा हा त्यांचे राहते पत्यावर भेंडी चौक, आंबेगाव (बु) पुणे येथील हरणाई कॉम्प्लेक्स बिल्डींगचे पार्किंगमध्ये गाडी पार्क करुन जिन्याने चालत घरी जात असताना आरोपीनी फिर्यादी यांचे मुलास जुन्या भांडणाच्या वादातुन शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचेकडील गावठी पिस्टलने फिर्यादी यांचे मुलाचे दिशेने दोन राउंड फायर करुन सदरचे पिस्टल घेवुन पसार झाले होते. त्यानुसार आंबेगाव पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३८०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), १८९(२) १९०, १९१(२), ३५१(३) आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ३ (२७), म.पो.अ. ३७(१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे हे करीत आहेत.
सदर गुन्हयात वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे तपास पथकाने कसोशीने प्रयत्न करुन गोपनीय माहितीचे आधारे तसेच नमुद आरोपींच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करुन नमुद आरोपी यांचा शोध घेत असताना ते दख्खन हॉटेलचे रोडलगत, जांभुळवाडी पुणे येथे पिस्टल व जिवंत काडतुसांसह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण तीन पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. दाखल गुन्हयात आरोपी नामे १) शिवदत्त ऊर्फ सोन्या हरीकाका कोंढरे वय- २३ वर्षे २) श्रेयश रुपेश काटे वय-२३ वर्षे ३) सुरज सुभाष डिंबळे वय-२३ वर्षे ४) अतिष उमेश मोरे वय २८ वर्ष ५) ऋत्विक ऊर्फ दगडू पाडुरंग बेलदरे, वय-२४ वर्षे यांना अटक करण्यात आले असुन त्यांची दि. १४/०९/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. श्री. संजय दराडे पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, मा. श्री. मिलींद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर व मा. श्री. राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.शरद झिने आंबेगाव पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, तसेच पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवाजी पोटोळे, फिरोज शेख यांच्या पथकाने केली.
(श्री. शरद झिने) वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर.




