क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दहिवडी:-“ग्रामसुरक्षा दलाची साथ अन् दहिवडी पोलिसांचा दणका! घरफोडी-मोटार चोरीचे ६ गुन्हे उघडकीस; ₹२.०८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!”

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

दहिवडी:-“ग्रामसुरक्षा दलाची साथ अन् दहिवडी पोलिसांचा दणका! घरफोडी-मोटार चोरीचे ६ गुन्हे उघडकीस; ₹२.०८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!”

ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

उघेडकीस आले घरफोडी व चोरीचे ६ गुन्हे; तब्बल ₹२.०८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

दहिवडी / सातारा (RPS STAR NEWS प्रतिनिधी) — दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून माडी आंधळी परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटार चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण पथक तसेच शिंगणापूर दक्षता पथकाकडून आरोपींचा शोध सुरू होता.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विशाल चव्हाण, अविनाश चव्हाण आणि रोहित चव्हाण यांना ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांच्या साथीदारांच्या मदतीने माडी येथील पोपळढवळे, जळक तसेच बोडके परिसरात पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार चोरी केल्याची माहिती समोर आली.
तसेच माडी येथील राजमाने यांच्या घरात कोणी नसताना घराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे आणि माडी येथील चव्हाण यांच्या घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरी केल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी विशाल राजेंद्र चव्हाण (रा. माडी, ता. माण, जि. सातारा), अविनाश कुंडलिक चव्हाण (रा. माडी, ता. माण, जि. सातारा) आणि रोहित हणमंत चव्हाण (रा. माडी, ता. माण, जि. सातारा) यांना अटक केली आहे.
आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी, दागिने, गहू, मोटारसायकल आदींसह एकूण ₹२,०८,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
👮 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
ही कारवाई पोलीस अधीक्षक वैशाली कडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत तसेच दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प वडूज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे, नंदकुमार खाडे, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरवट, निलेश कुळदे, महेंद्र खाडे, संतोष विरकर, महेश सोनवळकर व सुधीर करचे यांनी सहभाग घेतला.
गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे, नंदकुमार खाडे व प्रकाश हांगे करीत आहेत.

RPS STAR NEWS | निर्भीड बातमी, थेट जनतेच्या प्रश्नांवर.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button