आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-जनता शिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त शेखर गायकवाड यांचे व्याख्यान.

पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-जनता शिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त शेखर गायकवाड यांचे व्याख्यान.

वाई: दि. ११ सप्टेंबर २०२६ जनता शिक्षण संस्थेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त दर महिन्याच्या १२ तारखेला विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यातील दुसरे पुष्प गुंफण्यासाठी माजी सनदी अधिकारी, महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त व यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड शनिवार दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. किसन वीर महाविद्यालय प्रांगणात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सदर समारंभास संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शेखर गायकवाड हे २००२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, महाराष्ट्रातील त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि जन-केंद्रित प्रशासकीय कार्यशैलीसाठी ते सर्वत्र ओळखले जातात. तीन दशकांहून अधिक प्रशासकीय अनुभव असलेल्या गायकवाड यांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, साखर आयुक्त आणि ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक यांसारखी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. अन्नसुरक्षा, जलसंधारण आणि भू-प्रशासन या क्षेत्रांतील त्यांच्या महत्त्वपूर्ण व अभिनव उपक्रमांसाठी त्यांची विशेष प्रशंसा केली जाते; यातील अनेक उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. तसेच ते उत्कृष्ट वक्ते असून त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतील अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे.
कार्यक्रमास वाई पंचक्रोशीतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून, व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button