ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रेस क्लब प्रवरेच्या अध्यक्षपदी विजय बोडखे उपाध्यक्षपदी प्रमोद कुंभकर्ण . प्रसिद्ध प्रमुख म्हणून कोडीराम नेहे यांची निवड.

प्रतिनिधी:-कोंडीराम नेहे अहमदनगर :-7507469042

लोहगाव( प्रतिनिधी ) :- प्रेस क्लब प्रवरेच्या अध्यक्षपदी विजय बोडखे (राजुरी) तर उपाध्यक्षपदी प्रमोद कुंभकर्ण (कोल्हार) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
राहाता तालुक्यातील प्रेस क्लब प्रवरा या नुतन संघटनेची . नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर ही निवड जाहीर करण्यात आली असून ही निवड एका वर्षासाठी असून या संघटनेमध्ये सुभाष कोंडेकर यांची सचिव पदी (कोल्हार) तर प्रसिद्ध प्रमुख कोंडीराम नेहे (लोहगाव) कार्याध्यक्ष म्हणून संजय कोळसे (कोल्हार )खजिनदार पदी सुहास वैद्य (कोल्हार) निमंत्रक प्रवीण बेंद्रे (कोल्हार ) संघटनेचे मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के (लोणी) प्राध्यापक रवींद्र काकडे( लोणी) सिताराम चांडे (लोणी) गणेश आहेर (लोणी) संजय शिवलेकर (कोल्हार )प्राध्यापक अनिल बेंद्रे( बाभळेश्वर) प्रकाश अवताडे (बाभळेश्वर) कैलास घोरपडे (निर्मळ पिंपरी) यमन फुलाटे (दुर्गापुर) विनोद पारखे (लोणी) साईप्रसाद कुंभकर्ण (कोल्हार )या व्यतिरिक्त सर्व ग्रुप वरील सन्माननीय जेष्ठ पत्रकार यांना सदस्य करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले असून या
संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार तसेच पत्रकारांसाठी कार्यशाळा, झाडे लावा झाडे जगवा असे विविध सामाजिक उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button